Chamba Car Accident : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात गुरुवारी रात्री मोठा अपघात घडला, ज्यात एका कुटुंबासह एकूण ६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात चुरा उपविभागातील सौया पाथरी परिसरात घडला, जेव्हा स्विफ्ट कार (क्रमांक HP 44 4246) डोंगराळ रस्त्यावरून जात असताना अचानक डोंगरावरून एक मोठा दगड कारवर (Himachal Car Crash) कोसळला.