Rashi Bhavishya
Rashi Bhavishya 
सप्तरंग

जाणून घ्या आजचे दिनमान आणि पंचांग : 11 मे

सकाळवृत्तसेवा

आजचे दिनमान 
मेष :
महत्त्वाचे निर्णय टाळावेत. शासकीय कामात यश लाभेल. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल. 

वृषभ : आरोग्य चांगले राहणार आहे. आर्थिक क्षेत्रात संमिश्र स्थिती राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. 

मिथुन : व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विद्यार्थ्यांना विशेश यश मिळणार आहे. 

कर्क : प्रॉपर्टीच्या क्षेत्रातील व्यक्‍तींना विशेष यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. चाललेल्या कामात प्रतिष्ठा लाभेल. 

सिंह : अपेक्षेपेक्षा यश अधिक मिळेल. काहींना गुरूकृपा लाभेल. तुमच्या कर्तृत्त्वाला विशेष संधी लाभेल. 

कन्या : कार्यक्षेत्रात चांगली संधी मिळेल, प्रसिद्धी लाभेल. भागीदारी व्यवसायात विशेष यश मिळेल. उत्साहाने दिवसभर कार्यरत रहाल. 

तूळ : सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. प्रसन्नता लाभेल. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. 

वृश्‍चिक : हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहे. मुलामुलींच्या संदर्भात चांगली घटना घडेल. आरोग्य चांगले राहील. 

धनू : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. हाती घेतलेल्या कामामध्ये अडचणी येण्याची शक्‍यता आहे. पत्नीकरिता जादा खर्च करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

मकर : आनंद देणारी एखादी बातमी समजेल. व्यवसायाची उलाढाल वाढेल. सांस्कृतिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. 

कुंभ : व्यवसायात मनासारखे वातावरण राहील. थोरामोठ्यांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात धाडस करावयास हरकत नाही. 

मीन : एखादी भाग्यकारक घटना घडेल. नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल. 

पंचांग
शनिवार : वैशाख शुद्ध 7, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, सूर्योदय 6.04, सूर्यास्त 7, चंद्रोदय सकाळी 11.37, चंद्रास्त रात्री 12.17, गंगोत्पत्ती, गंगापूजन, भारतीय सौर वैशाख 21, शके 1941. 

दिनविशेष 
राष्ट्रीय विज्ञान तंत्रज्ञान दिन 

  • 1998 - 24 वर्षानंतर भारताने पुन्हा राजस्थानच्या वाळवंटातील पोखरणच्याच परिसरात हायड्रोजन बॉम्बनिर्मितीसाठीच्या साधनासह 'फिजन डिव्हाईस', 'लो-यिल्ड डिव्हाईस' आणि 'थर्मो-न्यूक्‍लिअर डिव्हाईस' या तीन यशस्वी आण्विक चाचण्या घेतल्या. 
  • 2000 - कडूलिंबाच्या तेलाचे अमेरिकेला दिलेले संयुक्त पेटंट युरोपीय पेटंट कार्यालयाने रद्द केले. 
  • 2010 - जगज्जेत्या विश्‍वनाथन आनंदने आपला उच्च दर्जा सिद्ध करीत जागतिक बुद्धिबळाचे विजेतेपद राखले. आनंदने चार वेळा जगज्जेतेपद मिळविले. (2000,2007,2008,2010). पाच वेळा बुद्धिबळ ऑस्कर (खेळातील सर्वोत्तम पुरस्कार), बुद्धिबळातील सर्व प्रकाराचे जगज्जेतेपद जिंकलेला एकमेव, सर्वांत कमी वयात जागतिक क्रमवारीत अग्रस्थान मिळविण्याचा विक्रम, राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी, 1997 मध्ये जागतिक कुमार विजेता ही त्याची आतापर्यंतची उल्लेखनीय यशाची उदाहरणे आहेत. 
  • 2018 - तेलंगणमधील शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या सरकारने बहुचर्चित 'रयतू बंधू' या विशेष योजनेस सुरवात केली. या योजनेद्वारे राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना वार्षिक 8000 रुपये दरवर्षी अनुदान देणारी देशातील पहिली योजना म्हणून 'रयतू बंधू' कडे पाहिले जात आहे.

सुविचार 
आपल्या तत्त्वांची खरी परीक्षा संकटातच असते, त्याशिवाय, आपण प्रामाणिक आहोत का नाही, हे समजत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT