Social Media
Social Media esakal
सप्तरंग

दिलखुलास : आभासी दुनियेमागचं ‘वास्तव’

सकाळ वृत्तसेवा

आजकालचं युग हे गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्युब, ब्लॉग, वेबसाइट्सचं आहे. अर्थात इंटरनेटचं आहे आजच्या काळात इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे.

- कांचन अधिकारी

आजकालचं युग हे गुगल, व्हॉट्सॲप, फेसबुक, यूट्युब, ब्लॉग, वेबसाइट्सचं आहे. अर्थात इंटरनेटचं आहे आजच्या काळात इंटरनेट आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. इंटरनेटमुळे जग जवळ आलं आहे. आज इंटरनेटद्वारे आपण सहज दुसऱ्या देशातील व्यक्तीशी काही सेकंदाच्या आत संवाद साधतो, त्यांच्याशी फेसटॉक करतो. इंटरनेटमुळे लोकांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात क्रांती घडून आली आहे. एक काळ होता जेव्हा कॉल लावायचा म्हणजेही क्वचितच लावायचा असं होतं; पण आता आपण अगदी सहन व्हॉट्सॲप कॉल (व्हिडिओ कॉलही) अगदी लावतो. इंटरनेटच्या वापरामुळे घरबसल्या आपण अनेक क्लासेस करू शकतो. अगदी शिक्षणही घेतो याचा अनुभव आपणा सर्वांनी लॉकडाउनमध्ये घेतला आहे.

इंटरनेटच्या सहाय्याने आपण मनोरंजन क्षेत्रही अगदी जवळून पाहू शकत आहोत. ओटीटी प्लॅटफॉर्म हे त्याचं अगदी जिवंत उदाहरण आहे. यात फायदा आहेच; पण तोटाही असा आहे, की सामूहिकरित्या आपण कलेचा आस्वाद घेण्याच्या आनंदाला मुकत आहोत. लॉकडाऊनमध्ये ओटीटीवर खूप चित्रपट पाहूनही आपल्याला ओढ लागून राहिली होती ती बाहेर जाऊन चित्रपटगृहात बसून पॉपकॉर्न खात खात चित्रपट पाहण्याची.

शिवाय सतत लॅपटॉपवर बसून पाठीचे, मानेचे, डोळ्यांचे विकार खूप प्रमाणात वाढले होते. थोडक्यात काय, तर उत्क्रांती हवीच; पण तिचा प्रमाणाबाहेरचा वापर हा घातक ठरणारा असणार आहे.

व्यावसायिक क्षेत्रात इंटरनेटचा वापर जोरदार होत आहे. ऑनलाइन शॉपिंग ही संकल्पना जर आपल्याला कुणी दहा-पंधरा वर्षांपूर्वी सांगितली असती, तर आपण हसलो असतो; पण आज आपण सर्रास ऑनलाइन शॉपिंग करत असतो- इंटरनेटमुळे आपण एका देशातील वस्तू दुसऱ्या देशात विकू शकतो. यामुळे आंतरदेशीय औद्योगिकरणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे

इंटरनेटमुळे पर्यटनाचं व्यवस्थापन आता तुमचं तुम्ही करू शकता. म्हणजे नेटमुळे ऑनलाइन टिकेटिंग, हॉटेल्स बुकिंग, आंतरदेशीय शोजची बुकिंग्ज सर्व काही एका क्लिकवर आलंय. रस्ता, मार्ग शोधणंही सोपं झालंय.

हे सर्व फायदे असले तरी माणूस माणसापासून दूर होत चाललाय. पूर्वी एकमेकांचे वाढदिवस आपल्याला लक्षात असायचे; पण आता फेसबुक किंवा व्हॉटसॲपवर कळतात. तसंच आपला आणि इतरांचा फोन नंबर आपल्या लक्षात असायचा; पण आता फोनबुकमध्ये असल्यामुळे याचाही त्रास नाही. पूर्वी आपण साधी सोपी बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार तोंडी करायचो, आत्ताची पोरं लगेच मोबाईलमधील कॅल्सी काढतात. त्यामुळे गणिती ज्ञान कमी झालं. इतकंच काय आमच्यावेळी आम्ही लंगडी, डब्बा ऐसपैस, खो-खो असे मैदानी खेळ खेळायचो, त्यामुळे आमची तब्येत चांगली झाली. आता सगळे व्हिडियो गेम्सना चिकटलेले असतात.

मोबाईलवर अश्लील गोष्टी विकून पैसे कमावणं हा एक नवा धंदा निर्माण झाला आहे. त्यामुळेच तर तरुणाई बिघडते आहे. बलात्कारांची संख्या वाढते आहे. इंटरनेटमुळे सर्वांत बोकाळलं आहे ते सोशल मीडियाचं वर्तुळ. सोशल मीडियावर बर्थडे वगैरे विश करणारे घरी येऊन चौकशी कधीच करत नाहीत. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. आपल्याला एकमेकांबरोबर वेळ घालवावासा वाटणं साहजिक आहे; पण ‘जादूची झप्पी’ आजकाल काचितच मिळते. मिळतो तो कोरडा संस्कार. सगळं जग virtual झालंय; पण मला आनंद मिळतो तो माझ्या मैत्रिणीना Actual भेटण्यात.

(समाप्त)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

Latest Marathi News Live Update : अमेठी-रायबरेलीमधून राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीबाबत जयराम रमेश काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT