ITI Students
ITI Students Sakal
सप्तरंग

आयटीआयला खुणावताहेत परदेशी रोजगार!

अवतरण टीम

- संध्या गरवारे

आयटीआयच्या विद्यार्थ्यांना यावर्षी जपान आणि जर्मनीमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत. त्यानिमित्त ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या सुविधा केंद्राबाबत...

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचा दर्जा वाढवण्यासाठी राज्यातील ७५ औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सुरू झाल्या आहेत. त्यापुढे जाऊन सर्व आयटीआयमध्ये व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करून, रन फॉर स्किल, २६० मतदारसंघात युवक-युवतींसाठी छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मेळाव्यांचे आयोजन केले आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल या आंतरराष्ट्रीय सुविधा केंद्रामार्फत रोजगार प्राप्त व्हावेत यासाठी २७ देशांशी रोजगारासाठी सामंजस्य करार केला जाणार आहे. आगामी काळात तीन हजार ५०० विद्यार्थ्यांना परदेशी रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय आहे. या सुविधा केंद्राच्या माध्यमातून अतिशय कमी खर्चात आपल्या युवकांना परदेशी जाता येईल, अशी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांना आशा आहे.

भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. वय वर्षे १८ ते ३५ वयोगटातील लोकसंख्या अधिक असल्याने आपण तरुण ठरतो, ही बाब आपल्याला अभिमानाची आहेच. मात्र हे बलस्थान लक्षात घेता या वयोगटातील तरुणांना बदलत्या काळाची पावले ओळखून कौशल्य विकासाला बळ देण्याची गरज आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्कील इंडियाला प्रोत्साहन दिलेले आहे.

अनेक विकसित देशांची (उदा. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, जपान) कार्यरत वयोगटाची लोकसंख्या कमी होत चालली आहे. असे देश कुशल मनुष्यबळाची मागणी करत आहेत. भारतातील सद्यस्थितीत तरुण वयोगटाचे प्रमाण ६२ टक्क्यांवरून २०३० पर्यंत ६८ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. अशा परिस्थितीत जगासाठी उच्च दर्जाचे कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याची संधी आपल्या देशाला मिळत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाने कुशल कर्मचाऱ्यांच्या वाढत्या जागतिक मागणीची पूर्तता करण्यासाठी आणि आयटीआयच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना चांगल्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या रोजगार सुविधा केंद्राद्वारे राज्यातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षेत्रात, जगात सर्वोत्तम बनण्यासाठी पहिले पाऊल उचलण्यास सक्षम बनविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

नवीन तंत्रज्ञानाच्या विकासामुळे नोकरीच्या नवनवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आयटीआयच्या माध्यमातून दरवर्षी अडीच लाख विद्यार्थी कौशल्य प्रशिक्षण घेऊन बाहेर पडतात. नवीन तंत्रज्ञानावर आधारित नोकरीच्या संधीचा महाराष्ट्रातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ व्हावा, यादृष्टीने महाराष्ट्र शासनाचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय सातत्याने प्रयत्न करीत असते.

या प्रयत्नांचेच फलित म्हणून आयटीआयमधून बाहेर पडणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी नोकऱ्या उपलब्ध होतात. यात मानाचा तुरा म्हणजे गेल्या काही वर्षापासून आयटीआयच्या विद्यार्थ्यांना परदेशातदेखील नोकऱ्या मिळत आहेत. यावर्षी एकूण ५८ विद्यार्थ्यांना परदेशात नोकरी मिळालेली आहे. जपानमध्ये तीन आणि जर्मनीमध्ये ५५ अशा एकूण ५८ नोकऱ्या परदेशात मिळाल्या आहेत.

नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या ‘ग्लोबल स्कील गॅप रिपोर्ट’नुसार वर्ष २०२५ पर्यंत आरोग्य, बांधकाम, कृषी, वाहतूक, वस्तू निर्मिती, खाद्यपदार्थ निर्मिती, वित्तीय इन्शुरन्स सेवा इत्यादी क्षेत्रात अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, सिंगापूर, जपान, न्यूझीलंड, मलेशिया इ. देशांत अंदाजे ८.५ ते ९.५ लाख, आखाती देशात २६.३४ लाख, तसेच युरोपियन देशांमध्ये ३.०५ अशा एकूण सुमारे ३८ लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतातील युवांना जागतिक बाजारपेठेत संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना जागतिक बाजारपेठेला आवश्यक व संबंधित कौशल्य प्रशिक्षण प्रदान करणे आवश्यक आहे. त्याद्वारे त्यांना आंतरराष्ट्रीय रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ ही नावीन्यपूर्ण संकल्पना सुरू होत आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनलमार्फत जगभरातील विविध देशांसमवेत समन्वय साधून कुशल मनुष्यबळासाठी उपलब्ध रोजगार संधी एकत्रित करून राज्यातील कुशल उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगारासाठी मार्गदर्शन व मदत देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे.

महाराष्ट्र इंटरनॅशनल राज्याला दर्जेदार कुशल मनुष्यबळ पुरविणारा जागतिक स्रोत बनवणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल योजने’ची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय हे काम पाहत आहे.

राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रशिक्षित झालेल्या ५८ उमेदवारांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनद्वारे एप्रिल २०२३ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आंतरराष्ट्रीय जॉब फेअर’मध्ये राज्यातील २००५ उमेदवारांनी नोंदणी केली आहे.

(लेखिका महाराष्ट्र राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात सहायक संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT