book review
book review 
सप्तरंग

वेध राजकीय पत्रकारितेचा...

डॉ. श्रीनिवास भोंग

इम्तियाज जलील, मनीष सिसोदिया, संजय राऊत, कुमार केतकर या नावांमध्ये काय साम्यस्थळ आहे? एम. जे. अकबर, अरुण शौरी, राजीव शुक्‍ला हे राजकारणात येण्यापूर्वी काय करत होते? या साऱ्याजणांची ओळख राजकीय पत्रकार अशी आहे. पत्रकारितेतील या क्षेत्राचा धांडोळा घेणं, हा डॉ. बाळ ज. बोठे-पाटील यांच्या 'राजकीय पत्रकारिता' पुस्तकाच्या निर्मितीमागचा प्रमुख उद्देश आहे.

नव्या शैक्षणिक धोरणानं आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम व व्यावसायिक कौशल्य विकासाला केंद्रस्थान दिलं आहे. राजकीय पत्रकारिता हा आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम आहे. राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारितेचं कौशल्य या अभ्यासक्रमातून विकसित होईल. पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला भारतीय राजकीय प्रक्रियेचं ज्ञान या अभ्यासक्रमामुळं प्राप्त होईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं राज्यशास्त्र विषयाच्या पदवी अभ्यासक्रमात राजकीय पत्रकारिता या विषयाचा नव्यानं समावेश केला आहे. या अभ्यासक्रमासाठी बोठे यांच्या 'राजकीय पत्रकारिता' या पुस्तकाचा समावेश विद्यापीठानं संदर्भ ग्रंथ म्हणून केला आहे. 'सकाळ' प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाला राज्यशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य पी. डी. देवरे यांची प्रस्तावना आहे.
बोठे यांना राजकीय पत्रकारितेचा तीस वर्षांचा अनुभव आहे. सध्या ते 'सकाळ'च्या नगर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत. आपल्या पत्रकारितेच्या अनुभवांच्या आधारे त्यांनी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार या पुस्तकाची विभागणी आठ प्रकरणांत केली आहे. राजकीय पत्रकाराला सर्वसमावेशकता, विश्‍लेषण क्षमता, वस्तुस्थितीशी चिकटून राहण्याची तयारी, निष्पक्षता, कठोरता, व्यावसायिकता, पारदर्शकता... असे अनेक गुण आवश्‍यक असतात. पत्रकारानं काय करावं आणि मुख्य म्हणजे काय करू नये, या धावपळीच्या क्षेत्रात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी आणि बातमीची डेडलाइनही कशी पाळावी, या संदर्भात कळीच्या सूचना पुस्तकात करण्यात आल्या आहेत.

आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, त्या क्षेत्राचं समीक्षण करण्याची डॉ. बोठे यांची भूमिका आहे. त्यामुळंच माध्यमांचं साचलेपण असो अथवा राजकारणाचं माध्यमीकरण, अशा संकल्पनांची सटीक मांडणी त्यांनी केली आहे. जाहिरात व पेड न्यूजमधील फरक पुस्तकात स्पष्ट केलाय. एखादी बातमी पेड न्यूज आहे किंवा नाही, हे ठरविण्याचे निकष, पेड न्यूजबाबत निवडणूक आयोगाची कारवाई याची विस्तृत चर्चा लेखकानं केली आहे. प्रसार माध्यमं नसतील तर निवडणुका हुकूमशाही पद्धतीनं होतील आणि सर्वसामान्यांवर अन्याय होईल, असं महत्त्वाचं निरीक्षण 'राजकीय पत्रकारिता' हे पुस्तक नोंदवतं.

आपल्या अग्रलेखांनी परकीय सरकारला हादरवून सोडणाऱ्या लोकमान्य टिळकांच्या स्मृती शताब्दी वर्षामध्ये 'राजकीय पत्रकारिता' या पुस्तकाचं प्रकाशन औचित्यपूर्ण आहे. हे वर्ष संपूर्ण मानवी जीवनात परिवर्तनाचं एक महत्त्वाचं वर्ष आहे. कोरोना संकटाच्या काळातील बदलत्या परिस्थितीला 'न्यू नॉर्मल’ असं म्हटलं जातं. राजकीय पत्रकारितेच्या क्षेत्रातील न्यू नॉर्मल या संकल्पनेला साजेसं असंच हे पुस्तक आहे.

पुस्तकाचं नाव : राजकीय पत्रकारिता
लेखक : ॲड. डॉ. बाळ ज. बोठे-पाटील
प्रकाशक : सकाळ प्रकाशन, पुणे (०२० - २४४०५६७८, ८८८८८४९०५०)
पृष्ठं : १४२, मूल्य : १९९ रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT