tim pen and ollie robinson sakal
सप्तरंग

समाजमाध्यमावर भान बाळगायलाच हवं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. परस्परविरोधी किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू दर्शवणाऱ्या असं म्हटलं तरी चालेल.

शैलेश नागवेकर saptrang@esakal.com

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांत दोन महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. परस्परविरोधी किंवा एकाच नाण्याच्या दोन बाजू दर्शवणाऱ्या असं म्हटलं तरी चालेल. ए. बी. डीव्हिलिअर्सची संपूर्ण क्रिकेटमधून निवृत्ती आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन याच्यावर सहा वर्षांपूर्वीच्या अश्लील ट्विटमुळे ऑस्ट्रेलिया कसोटीचं कर्णधारपद सोडण्याची आलेली नामुष्की. डीव्हिलिअर्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून कधीच निवृत्त झाला होता. केवळ आयपीएल आणि एखाद् दुसरी लीग तो खेळत होता. तरीही त्यानं केलेला गुडबाय हळहळ वाटायला लावणारा होता; पण टिम पेनच्या कृत्याबाबत मात्र ‘झालं ते चांगलंच झालं,’ अशी भावना सर्वच जणांनी व्यक्त केली. या दोन घटनांमघ्ये समान धागा होता तो ट्विटर या समाजमाध्यमाचा अर्थात् सोशल मीडियाचा. दोघांनीही आापल्या ‘भावना’ व्यक्त करण्यासाठी ट्विटरचा आधार घेतला.

‘क्रिकेट बदललंय,’ असं हल्ली सहजपणे बोललं जातं. हा बदल केवळ मैदानापुरता मर्यादित नाही, त्या सीमारेषा या बदलानं कधीच पार केल्या आहेत. हा बदल खेळाडूंच्या विचारसरणीतही रुजलेला आहे आणि त्यावर कळत-नकळत प्रभाव समाजमाध्यमांचा आहे. हे माध्यम दुधारी आहे. सावधपणा बाळगला नाही तर जखम झालीच म्हणून समजा. टिम पेन याला किती पेन (वेदना) झाली असेल हे तोच सांगू शकतो.

ऑस्ट्रेलियाचं कसोटी-कर्णधारपद हे सर्वात प्रतिष्ठेचं समजलं जातं. कारण, या परंपरेत डॉन ब्रॅडमन यांचा समावेश आहे. पेन यानं ही परंपरा वेगळ्याच कारणामुळे कलंकित केली. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियाच्या कसोटीमध्ये ही वेळ आली. यापूर्वी चेंडू कुरतडण्याप्रकरणी बॅनक्रॉफ्ट या खेळाडूला प्रोत्साहन दिल्याबद्दल स्टीव्ह स्मिथला कर्णधारपद अशाच प्रकारे गमावावं लागलं होतं. पेनबाबत बोलायचं तर ‘दैव देतं आणि ट्विटरवरील उथळपणाचं कर्म घेऊन जातं,’ असंच म्हणावं लागेल.

अन्न-वस्त्र-निवारा या सर्वसामान्यांचा प्राथमिक गरजा; पण या आधुनिक जगात खेळाडूंच्या प्राथमिक गरजांमध्ये समाजमाध्यमाचाही समावेश कधी झाला हे त्यांचं त्यांनाही उमगलं नसेल! खेळाडूंच्या मैदानावरील कामगिरीपेक्षाही समाजमाध्यमावरील त्यांची सक्रियता आणि त्यांचे फॉलोअर्स हे घटकच त्यांची लोकप्रियता अधिक प्रमाणात ठरवत असतात. फुटबॉलसम्राट रोनाल्डो आणि लिओनेल मेस्सी यांच्यात तर या माध्यमांतही स्पर्धा तीव्र आहे; पण समाजमाध्यमाचा वापर न करताही लोकप्रियता कमालीची असू शकते. महेंद्रसिंह धोनी आणि टीम इंडियाचा आदर्शवत् प्रशिक्षक राहुल द्रविड ही त्यासाठी उत्तम उदाहरणं आहेत. द्रविडचं तर ट्विटवर अकाउंटही नाही. धोनी धूमकेतूसारखा आला आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती समाजमाध्यमाद्वारे जाहीर करून त्या चावडीवरून पुन्हा गायबही झाला. ही उदाहरणं देण्याचा उद्देश एवढाच की, समाजमाध्यमाचा लोभ म्हणा की मोह म्हणा, सामाजिक भान ठेवलं नाही तर कशा प्रकारे खड्ड्यात घेऊन जाऊ शकतो हे पेन याच्या उदाहरणावरून स्पष्ट होतं.

रॉबिन्सन पहिला बळी

समाजमाध्यम खेळाडूंनी किती सावधपणे वापरावं हे पेनच्या घटनेमुळे एकीकडे सिद्ध होत असतानाच, काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये समाजमाध्यमानं ‘विकेट’ घेतलेला इंग्लंडचा अष्टपैलू ऑली रॉबिन्सन हा पहिला खेळाडू ठरला होता. बेन स्टोक्ससाठी पर्याय म्हणून त्याला इंग्लंडच्या संघात स्थान मिळालं. पदार्पणाच्या कसोटीत त्यानं चमकदार कामगिरीही केली; परंतु आठ वर्षांपूर्वी त्यानं केलेलं अश्लील आणि वांशिक ट्विट अचानक वर आलं आणि त्यानं रॉबिन्सनचा बळी घेतला. त्यानं माफीही मागितली; परंतु काही सामन्यांच्या बंदीची शिक्षा त्याला भोगावी लागलीच.

भात्यातून सुटलेला बाण

एखादा खेळाडू; मग तो कोणत्याही खेळातला असो, मैदानावर खेळताना जी प्रगल्भता आणि हुशारी दाखवतो, तशीच ती त्यानं समाजमाध्यम वापरतानाही दाखवायची असते. तिथं मार्गदर्शन करणारा कुणी गुरू नसतो. तुमचं तुम्हीच ठरवायचं असतं. हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांचं माध्यम त्या वेळी टीव्हीवरचा टॉक शो हे होतं; परंतु करण यांची कॉफी त्यांच्यासाठी फारच कडू ठरली होती. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात उधळलेल्या मुक्ताफळांमुळे हार्दिक पंड्या तर आजही व्यथित होतो; पण टीव्हीवर चलच्चित्रात वापरलेले शब्द असोत वा समाजमाध्यमावरचे शब्द असोत, बाण एकदा भात्यातून सुटला की मागं घेता येत नाही. डिलिटचं बटण तुम्ही वापराल; पण बॅकअपमधून शब्द कधीच पुसले जात नाहीत.

प्रशिक्षकांचंही लक्ष हवं

समाजमाध्यमावर सावधगिरी बाळगण्याची प्रक्रिया खरं तर खेळाडू ज्युनिअर असतात तेव्हापासूनच सुरू होते, त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षकांची जबाबदारी ही केवळ मैदानावरील कौशल्याला पैलू पाडण्यापुरतीच मर्यादित राहत नाही, तर परिपूर्ण खेळाडू घडवण्यासाठीसुद्धा प्रशिक्षकांचं चौफेर लक्ष असणं ही बाब महत्त्वाची ठरत असते.

एकीकडे मैदानावर घडत असलेला आपला शिष्य समाजमाध्यमाच्या मैदानावर किती सक्रिय आहे आणि तो तिथं काय काय पोस्ट करत असतो यावर लक्ष ठेवणं आता गरजेचं ठरत चाललं आहे. कारण, सट्टेबाजीसारखी अनेक प्रलोभनं इथून येऊ शकतात. नको त्या ओळखी होऊ शकतात, त्यामुळे ‘नजर हटी, दुर्घटना घटी’ असे प्रकार लहान वयात खेळाडूची जडणघडण होत असतानाच रोखले गेले तर ‘पेन’ किंवा ‘रॉबिन्सन’ होण्याची वेळ कुणावर येणार नाही.

ऑलिंपिकसारख्या सर्वात प्रतिष्ठेच्या स्पर्धेत जेव्हा प्रथितयश खेळाडू अंतिम टप्प्याच्या तयारीत झोकून देत असतात तेव्हा सिंधूसारखे खेळाडू समाजमाध्यमावरून ‘लॉगऑफ’ होत असतात ते उगाचच नव्हे. टिम पेन किंवा ऑली रॉबिन्सन ही उदाहरणं केवळ खेळाडूंसाठीच आहेत असं नाही, तर ती सर्वसामान्यांसाठीही आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Viral Video : सुनेची आईसोबत मिळून सासुला बेदम मारहाण; झिंज्या पकडल्या, उचलून आपटलं अन्... व्हिडिओ व्हायरल

CA Result Success Story: अभ्यासातील सातत्य, जिद्दीच्या बळावर साकारले स्वप्न; राजनवर कौतुकाचा वर्षाव; सीए परीक्षेत ६०० पैकी मिळविले ५१६ गुण

Oneplus Nord CE 5 : वनप्लस Nord CE 5 लवकरच होणार लॉन्च; 7100mAh दमदार बॅटरी, आकर्षक फीचर्स अन् किंमत फक्त..

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

SCROLL FOR NEXT