
Maharashtra Politics: त्रिभाषा सूत्र लागू करण्याच्या विरोधात ठाकरे बंधूंनी आक्रमक भूमिका घेतली होती. शेवटी सरकारने दोन्ही जीआर रद्द केले. यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ५ जुलैला विजयी मेळावा घेतला. तब्बल २० वर्षांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दिसले. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलोय आणि एकत्र राहू असं म्हणत युतीचे संकेत दिले. पण राज ठाकरेंनी यावर स्पष्ट बोलणं टाळलं आहे. आता राज ठाकरे यांनी युतीबाबत कोणीही बोलू नये अशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती समोर येत आहे.