
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुरम भागातून घरगुती हिंसाचाराची एक घटना समोर आली आहे. एका सुनेने तिच्या आईसोबत मिळून सासूला बेदम मारहाण केली. याचे सीसीटिव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडिओत स्पष्ट दिसते की सून सासुला पायऱ्यांवरुन फरफटत नेत आहे. झिंज्या ओढतेय. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.