Siddharth Hattiambire Parbhani district State President Scheduled Castes Department of Congress Party
Siddharth Hattiambire Parbhani district State President Scheduled Castes Department of Congress Party sakal
सप्तरंग

प्रगल्भ युवक ते कर्तृत्ववान पुरुष !

सकाळ वृत्तसेवा

सिद्धार्थ माणिकराव हत्तीअंबिरे म्हणजे बाबासाहेब आंबेडकर यांचे समतेचे विचार नसानसात भिनलेला एक उमदा युवक. विद्यार्थिदशेपासून वंचित समाज आणि युवकांसाठी काही तरी करण्याची तळमळ त्यांनी कायम उराशी बाळगली. परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यातील छोट्याशा गावात राहणाऱ्या सिद्धार्थ यांची घरची परिस्थिती तशी बेताचीच होती. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी आणि सोबत रोजगार शोधण्यासाठी त्यांनी परभणी शहर गाठले. तिथे महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी बहुजन समाजासाठी भरीव काही तरी करण्याचे ध्येय कधीच सोडले नाही. त्यांचे जीवन संघर्षमय होते; मात्र चळवळ त्यांना स्वस्थ बसू देईना. शिक्षण घेत असताना वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी एनएसयूआयचे काम सुरू केले. आपल्या नम्र स्वभावामुळे त्यांनी अल्पावधीतच मोठ्या प्रमाणात युवक अन् मित्र परिवार जोडला. त्या माध्यमातून त्यांनी गरजू व्यक्तींची जमेल तशी मदत करायला सुरुवात केली. गरिबांच्या प्रश्नांची तड लावण्यासाठी त्यांनी असंख्य दलित वस्त्या पिंजून काढल्या. त्यांचे प्रश्न आणि अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्याच्या दिशेने काम सुरू केले. प्रसंगी जनआंदोलने उभारली. हळूहळू त्यांनी परभणीपासून उभ्या मराठवाड्यात युवकांची मोट बांधली. जी आजही सामाजिक क्रांती घडवण्यासाठी झोकून देऊन काम करतेय.

आज सिद्धार्थ हत्तीअंबिरे हे नाव अवघ्या मराठवाड्याला परिचित आहे. मराठवाड्यात कुठेही दलित, बहुजनांवर अत्याचार होत असतील, तर हत्तीअंबिरे त्या गावी तातडीने पोहोचतात. महत्त्वाची बाब म्हणजे दोन समुदायांतील तणाव कमी करण्याला त्यांचे पहिले प्राधान्य असते. दोन्ही बाजूंच्या समजूतदार व्यक्तींना घेऊन त्यांच्यात संवाद घडवून आणून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम ते करतात. महत्त्वाचे म्हणजे ते पोलिस ठाण्यात अॅट्रोसिटीची केस दाखल होऊ न देता अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देतात आणि गावात पुन्हा जातीय तेढ निर्माण होत नाही. अत्याचार झालेल्या परिवाराला शक्य असेल तेवढी आर्थिक मदत करून पुन्हा पायावर उभे राहायलाही ते मदत करतात.

परभणीकरांचा हक्काचा माणूस

विद्यार्थिदशेपासूनच काँग्रेसच्या विचाराने प्रेरित असल्याने राज्य आणि राष्ट्रीय नेतृत्वापर्यंत त्यांचे काम अल्पावधीतच पोहोचले. जिल्हा स्तरावरून राज्य पातळीवर त्यांनी भरारी मारली. युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस, युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आणि आता काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अशा पदांपर्यंत सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी मजल मारली आहे. परभणीकरांचा हक्काचा माणूस आहे. केव्हाही आवाज द्या ते तयार असतात, असे त्यांच्याबाबत आज विश्वासाने म्हटले जाते.

सामाजिक कार्यात अग्रेसर

सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून मराठवाड्यातील बौद्ध विहारे आणि स्मारकांना मदत करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. तथागत गौतम बुद्ध यांचा शांतीचा संदेश तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ज्या ठिकाणी बौद्ध विहार आहे तिथे बुद्ध प्रतिमा देण्याचा संकल्प सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केला आहे. गेल्या आठवड्यात व्हिएतनाममधून आणलेल्या तथागत गौतम बुद्ध यांच्या पंचधातूच्या ३५६ पुतळ्यांचे वितरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते झाले आहे. त्याखेरीज बौद्ध विहाराच्या सर्वांगीण विकासाला ते शक्य तेवढी मदत करतात. महत्त्वाचे म्हणजे हा सर्व खर्च ते स्वतःच्या खिशातून करतात. गोरगरीब नागरिकांच्या मदतीला ते २४ तास धावून जात असतात. कोणाच्या रोजगाराचा प्रश्न असो, रेशनचा असो की आरोग्याचा, सिद्धार्थ हत्तीअंबिरे मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

यंदा १४ एप्रिलपर्यंत राज्यभरात संविधानाबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांच्या एक लाख प्रती वाटण्याचा उपक्रम सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी हाती घेतला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशके उलटून गेली तरी शोषित, वंचितांना अजूनही संविधानाबद्दल माहिती नाही. संविधानाने त्यांना दिलेले हक्क, अधिकार यांची त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केल्याचे हत्तीअंबिरे सांगतात.

कोरोना काळात मदतीसाठी पुढाकार

कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. लॉकडाऊनमुळे कित्येक कुटुंबांचे आर्थिक गणित विस्कळित झाले. बऱ्याच जणांचे रोजगार गेले. निराधार झालेल्यांची संख्याही मोठी होती... अशा गंभीर परिस्थितीत सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी घराबाहेर पडून सामान्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. धान्यापासून ते तेल-मिठापर्यंत त्यांनी मदत केली. त्यांच्या कामामुळे हजारो घरांतील चुली पेटल्या. संसारोपयोगी साहित्याच्या मदतीबरोबरच दवाखान्यात कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत यासाठी त्यांनी यशस्वी पुढाकार घेतला. ऑक्सिजन सिलिंडरची वाढलेली मागणी लक्षात घेऊन क्षणाचाही विचार न करता त्यांनी त्या काळात अनेकांना स्वखर्चातून ते मिळवून दिले. रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असताना त्यांनी ते मिळवून देण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले.

महामानवाच्या विचारांचा पाईक

तथागत गौतम बुद्ध आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याचा प्रसार तळागाळापर्यंत करण्याच्या उद्देशाने सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी चळवळीतही मोठे योगदान दिले आहे. समाजाला दिशा देण्यासाठी ते सातत्याने सामाजिक कार्यक्रम घेतात. त्या माध्यमातून समाजात प्रबोधन करण्याचे त्यांचे प्रयत्न असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळ्यादरम्यान आदर्श आणि उत्कृष्ट जयंती मंडळांचा सत्कार करणे, शांततापूर्ण वातावरणात सामाजिक उपक्रम राबवणाऱ्या पदाधिकाऱ्यांना गौरवणे असे कार्यक्रम ते दरवर्षी घेत असतात. भीमगीत संगीत रजनीचे शानदार आणि नेटके आयोजन करण्याची परंपरा सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनीच परभणीमध्ये सुरू केली. सलग तीन वर्षांपासून राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबवणे, रक्तदान शिबिर आदी अनेक उपक्रमांतून हत्तीअंबिरे यांची कामे सुरू असतात. छत्रपती शिवाजी महाराज जंयतीनिमित्त परभणीत ते व्याख्यानही घेतात.

समाजसेवेचा चढता आलेख

सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी जवखेडा इथे झालेल्या दलित अत्याचाराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर युवक काँग्रेसतर्फे मोर्चा काढला. त्यांचे काम बघून पक्षाने युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदावरून त्यांना राज्याचे सरचिटणीस केले. त्या पदावर असताना त्यांनी केलेले काम आणि आंदोलनाची दखल दिल्लीच्या काँग्रेस नेतृत्वाने घेतली.

त्यानंतर पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली गेली. त्या माध्यमातून आता त्यांचा राज्यभराच्या दलित आणि बहुजनांच्या न्याय्य हक्कांसाठी लढा सुरू आहे; मात्र हे सर्व काम करत असताना त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागायचा. पुढे कामाची व्याप्ती वाढत गेली. वेळ कमी आणि कामे अधिक अशी परिस्थिती निर्माण झाली. तेव्हा नागरिकांच्या समस्या वेगाने सोडवायच्या असतील तर राजकीय पक्षाच्या माध्यमातूनच ते घडू शकते हे सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी ओळखले आणि युवक काँग्रेसचे सदस्य म्हणून ते सक्रीयपणे काम करू लागले.

परभणी जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुढे आलेला एक उमदा तरुण. आपल्या आयुष्यात संघर्ष करत, सामाजिक कामाच्या जोरावर काँग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत मजल गाठतो. राजकारणात महत्त्वाचे पद मिळवल्यानंतरही सामाजिक जाणीव तसूभरही कमी न होऊ देता दलित, वंचितांच्या न्याय्य हक्कांच्या लढ्यासाठी कायम मैदानात उभा राहतो... हा कार्यकर्ता आहे सिद्धार्थ हत्तीअंबिरे. कोणाच्या रोजगाराचा, रेशनचा प्रश्‍न असो, की आरोग्याचा, सिद्धार्थ हत्तीअंबिरे मदतीसाठी सदैव तत्पर असतात.

- सिद्धार्थ हत्तीअंबिरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांचा ए़िडिटेड व्हिडिओ शेअर केल्याच्या आरोपावरून काँग्रेस आमदाराच्या 'पीए'ला अटक

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT