सप्तरंग

योग्य डाएट फॉलो करते (कंगना राणावत)

कंगना राणावत

स्लिम फिट
लहानपणापासूनच मला चांगली फिगर पाहिजे होती, त्यासाठी मी डाएटही करीत होते. मात्र, आपण करीत असलेले डाएट चुकीचे असल्याचे लक्षात आल्यावर ते सर्व सोडून योग्य सल्ला घेऊन माझा डाएट प्लॅन आखत गेले. मी जीमला जाण्याचा कधीच कंटाळा करीत नाही. मी आठवड्यातून पाचदा जीमला जातेच. इथे माझा ट्रेनर माझ्याकडून विविध प्रकारचे व्यायाम करवून घेतो. त्यानंतर शरीराची लवचिकता वाढविण्यासाठी मी ४५ मिनिटे योगासने व १० मिनिटे ध्यानधारणा करते. यामुळे शरीराबरोबर मनही एकाच वेळेस फ्रेश होते. जीमला जायचा अगदीच कंटाळा आल्यास मी त्या दिवशी नृत्य करते. खाण्याच्या बाबतीत मी कठोर नियम पाळते. गोड पदार्थ, हवाबंद पदार्थ, तेलकट, जंक फूड यांना मी कधीच राम राम ठोकला आहे. सकाळच्या नाष्ट्यात मी कडधान्य घेते. मधल्या वेळेत प्रोटिन शेक व फळे खाते. दुपारच्या जेवणात दोन पोळ्या, उकडलेल्या भाज्या, वरण-भात व फ्रेश सलाड घेते. संध्याकाळच्या नाष्ट्यात ब्राऊन ब्रेड वगैरे खाते. रात्रीच्या जेवणात उकडलेल्या भाज्या किंवा सलाड आणि सूप घेते. मी दर दोन तासांनी काहीतरी खात असते. मी आधी मांसाहारी होते, मला नॉनव्हेज खूप आवडायचे. मात्र, सध्या मी शाकाहारी झाले आहे, तसेच त्वचा चांगली राहण्यासाठी मी दिवसातून १० ते १२ ग्लास पाणी पिते.  

फिट राहण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो. काही मुली बारीक होण्यासाठी खाणेपिणे सोडतात, यामुळे त्या आजारी पडतात. असे न करता योग्य सल्ला घेऊन, शरीराची गरज लक्षात घेऊन डाएट करा. कॉफी पिण्यावर ताबा ठेवा, यामुळे भुकेवर परिणाम होतो व भूक मरते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, सुप्रिया सुळे मतदानासाठी दाखल

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT