सप्तरंग

पहिलं पाऊल महत्त्वाचं

गौरव मुठे

प्रत्येक माणसामध्ये काहीतरी कौशल्य असतं. शिवाय काहीतरी वेगळं करून दाखवण्याची उमेद असते. अर्थात यासाठी गरज असते ती आपल्या जिवलगांच्या साथीची. आयटी क्षेत्रातील विप्रो, इन्फोसिस आणि पटनी कॉम्प्युटर्स सारख्या आघाडीच्या कंपन्यांमध्ये काम केल्यांनतर स्वतःचं काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. मला देखील माझा फूड कोर्टचा व्यवसाय सुरु करण्यासाठी साथ मिळाली ती माझ्या नवऱ्याची. इतरांसाठी काहीतरी करण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करून त्यातून व्यवसाय उभा करण्यासाठी मला प्रेरणा मिळाली. 

स्वतःचा 'फूड ब्रँड' असावा या कल्पनेने मी सुरुवात केली. सुरुवातीच्या काही वर्षे केलेल्या नोकरीतून पैशांची बचत केली आणि त्यातून नवऱ्याच्या व्यवसायासाठी आणि माझ्या स्वनातील 'फूड ब्रँड'साठी बचत करण्यास सुरुवात केली आणि त्यातून 2015 मध्ये 'क्विक वोक'चे पहिले फूड कोर्ट सुरु केले आणि आज पुण्याच्या मोक्याच्या ठिकाणी चार फूड कोर्ट सुरु झाली आहेत. फूड कोर्टला लागणारे बरेचशे पदार्थ हे माझ्या देखरेखी खाली आम्ही तयार करून घेतो. त्यामुळे पदार्थाचा दर्जा आणि चव चांगली राहते. 'क्विक वोक'च्या माध्यमातून आतापर्यंत 50-60 हजार ग्राहक जोडण्यास मी यशस्वी झाली आहे. ज्यावेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. हीच तुमच्या कामाची पावती असते. त्यामुळेच तुमचे कोणतेही स्वप्न असेल तर ते प्रत्यक्षात आणण्यासाठी गरज आहे फक्त 'पाहिलं पाऊल' टाकण्याची आणि एकदा का तुम्ही सुरुवात केली की मग जग तुमचं आहे. मला काम सुरु केल्यानंतर अनेक अडचणी उभ्या राहिल्या. या व्यवसायातील सर्वात मोठी अडचण म्हणजे की कुशल आचारी मिळणे. मात्र नियोजन पद्धतीने काम केल्यास तुमच्या समस्या कमी होत जातात. 

प्रत्येकीचं स्वतःचं वेगळेपण असतं. आपलं करियर, छंद, घर, संसार, नवरा, मुलंबाळं… या साऱ्यांच्या पलीकडे… फक्त ते गवसणं आवश्यक असतं. अंतर्मुख होऊन थोडा स्वतःचा शोध घेतला की ते वेगळेपण सापडतं. आपल्यातील हेच वेगळेपण आपण प्रत्येकाने शोधायला पाहिजे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT