आपल्या सगळ्यांना अंधारातून उजेडात आणण्यासाठी थॉमस एडिसन चा मोठा हात आहे. तब्बल १४३ वर्षापूर्वी या पोरानं विजेच्या दिव्याचा शोध लावून शाळेतील आमच्यासारख्या असंख्य सर्वसाधारण मुलांच्या डोक्याला शॉट लावला. हे संशोधन मुळात क्रांतीकारी होतंच पण, Physics सारख्या विषयातील त्याचे धडे आमच्या पोरांना कायमचीच डोकेदुखी बनून राहीली. आज ह्याच एडिसनची १७५ वी जयंती. गरिबीतून संघर्ष करुन वर येऊन अवघ्या जगाला प्रकाशमय करणाऱ्या या संशोधकाविषयी आज आपण माहीती बघणार आहोत. (Thomas Edison Biography)
1847 मध्ये अमेरिकेत एडिसनचा जन्म झाला. त्याला ७ बहीणभाऊ होते. त्यातील हा सर्वात लहान म्हणजे शेंडफळ होता. शाळेतल्या मास्तरनी त्याला अतिशय 'ढ' विद्यार्थी म्हणून काढून टाकलं होतं. परंतु एडिसनला शांत बसण्याची मुळात सवयच नव्हती. काहीतरी सतत काहीतरी खटपट तो करायचा. मग त्याने आपल्या घराच्या पोटमाळ्यावर आपली एक प्रयोगशाळा थाटली.
या प्रयोगशाळेसाठी लागणारी रसायने विकत घेण्यासाठी थॉमसने वर्तमानपत्र विकण्याचं काम केलं. १८६२ मध्ये एडिसनने एक छोटासा मुलगा रेल्वे रुळावर खेळत असताना बघितला. तेवढ्यात एक ट्रक भरधाव वेगाने रेल्वे फाटकातून आत येताना दिसला. क्षणात एडिसन धावला व त्या मुलाला उचलून त्याने त्याचे प्राण वाचवले. तो मुलगा तेथील स्टेशनमास्तरचाच होता. मग त्या स्टेशनमास्तरने खूश होऊन एडिसनला तारायंत्राचे शिक्षण देऊन रेल्वे स्टेशनवर टेलिग्राफ ऑपरेटरचं काम दिलं. दिवसभर वेगवेगळ्या प्रयोगात मग्न असल्यामुळे एडिसनला रात्री झ़ोप यायची, म्हणून त्याने तारयंत्रालाच़ घड्याळ बसवलं. ते घड्याळच बरोबर तासातासांनी संदेश पाठवायचं. पुढे एडिसन १८६९ मध्ये टेलिग्राफ इंजिनिअर झाला.
त्यानंतर काही काळाने त्याने नोकरी सोडून पूर्णवेळ संशोधनावर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. तो कधीकधी ४-४ दिवस न झोपता सतत प्रयोग करत असायचा. तो दर दहा दिवसांनी काहीतरी नवीन प्रयोग करायचा. त्याने १८७६ साली आपली एक प्रयोगशाळा उभारली. ती प्रयोगशाळा नंतर शोधफॅक्टरी म्हणून ओळखली जाऊ लागली. तो दर दहा दिवसांना एक तर दर सहा महिन्यांनी एक मोठा शोध लावायचा. तो दरवर्षी तब्बल ४०० पेटंटसाठी अर्ज करायचा त्यामुळे त्याला शोधांचा व्यवसाय करणारा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. वयाच्या ८४ व्या वर्षापर्यंत त्याने १०९३ शोध आपल्या नावे करुन घेतले होते. त्याकाळचा तो अमेरिकेतील सर्वात यशस्वी संशोधक म्हणून ओळखला जाऊ लागला.
त्याअगोदरही विजेचा बल्ब तयार करण्याचा प्रयत्न अनेक संशोधकांकडून झाला परंतु त्यात बऱ्याच त्रुटी होत्या. विज्ञान संशोधकांच्या म्हणण्यानुसार तब्बल २२ संशोधकांनी विजेचा बल्बचा शोध लावण्यासाठी प्रयत्न केला होता. त्याअगोदरच्या शास्त्रज्ञांनी बनवलेल्या AC वीज हा शोध कसा हानीकारक आहे हे सिद्ध करुन दाखवण्यासाठी त्याने AC विजेचा झटका देउन एक हत्तीसुद्धा मारला होता. नंतर २१ ऑक्टोबर १८७९ ला त्याने तब्बल ४० तास चालणाऱ्या विजेच्या बल्ब चा शोध लावला. हा बल्ब बनवताना त्याला असंख्य वेळा अपयश आलं परंतु त्याने प्रयत्न न सोडता विजेवर चालणारा बल्ब जगाला भेट दिला. त्यानंतरही तो बरेच शोध लावत राहीला. नंतर अलेक्झांडर ने लावलेल्या टेलिफोनच्या शोधामध्येही एडिसनने बऱ्याच सुधारणा केल्या. १८९० मध्ये त्याने पहिला चित्रपट कॅमेरा बनवला. जो एका सेकंदात सुमारे २५ चित्रांवर क्लिक करु शकत होता. म्हणजे आपल्या भाषेत 25 FPS.
त्याने इलेक्ट्रॉनिक वोट रेकॉर्डर, ग्रोमोफोन, लाईट बल्ब, फोनोग्राम, ईलेक्ट्रिक ट्रेन, बॅटरी, किनेटोस्कोप, विद्युत उर्जा निर्मिती, कॅमेरा असे मोठमोठे शोध लावले. एडिसनचा मृत्यू हा एक शोधाच्या काळाचा शेवट होता. एवढे शोध लावणारा एकही संशोधक जगाने बघिलता नाही. हा एक महान संशोधक होता त्याने जगाला प्रकाशित केलं. विजेच्या बल्बचा शोध लागून तब्बल १४३ वर्षे झाली परंतु आजही भारतातील काही खेड्यापाड्यात वीज पोहचली नाही ही आपली शोकांतिकाच समजावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.