weekly horoscope
weekly horoscope 
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (ता. (१४ मार्च २०२१ ते २० मार्च २०२१)

श्रीराम भट saptrang@esakal.com

नको रे बाबा हा तडका!
फलज्योतिष हे ग्रहांची केमिस्ट्री अभ्यासते असेच म्हणावं लागेल. कारण माणूस हा जीवनाचा आस्वाद घेणारा किंवा जीवनात रस घेणारा प्राणी आहे. प्रत्येक ग्रहाचा एक स्वभाव असतो किंवा तो तसा आहे आणि हा ग्रहांचा स्वभाव एकमेकांच्या सान्निध्यातून म्हणा किंवा ग्रहयोगांतून म्हणा, माणसाच्या जीवनरसाला विशिष्ट फोडणी देत या माणूस नावाच्या जीवनरसाची एक पाककृतीच बनवत असतो! म्हणूनच माणूस ही एक अजब केमिस्ट्रीच आहे. माणूस हा एक गंध आहे, माणूस हा एक रंग आहे, माणूस ही एक चव आहे, माणूस हा एक स्पर्श आहे आणि या सर्वांना घेऊन माणूस हा एक सौंदर्य आहे. त्यामुळेच हे सौंदर्य पाहून माणसाची जगण्याची इच्छा वाढते म्हणा किंवा जगण्याविषयीची इम्युनिटी वाढते म्हणा! परंतु हल्ली बऱ्याच वेळेला ही माणसाची केमिस्ट्री एक जहाल तडका बनत, चवीचा चटका होत, अनेकांना झटकाच देत असते!

मित्रहो, सप्ताहात मंगळ-राहू यांच्या सान्निध्यातून एक प्रकारच्या फोडणीचा तडका काहींच्या जिभेला, मनाला किंवा हृदयाला पोळणार आहे. माणूस हा एक संग आहे, तसाच माणूस हा त्याच्या स्वभावाच्या केमिस्ट्रीतून असंगही बनत असतो! त्यामुळेच ‘असंगाशी संग’ हा वाक्प्रचार अस्तित्वात आला! सध्याच्या कोरोनाच्या काळात करण्यात येणारा ‘असंगाशी संग’ चांगलाच झटका देऊ शकतो. सध्याच्या अशा पार्श्‍वभूमीवर होणारा मंगळ-राहू सहयोग माणसाचा असंगाशी संग घडवून चांगलाच घात करू शकतो. तरी सप्ताहात सत्संगात राहा, नामस्मरणात राहा आणि सात्त्विक आहारच घ्या! तरच या मंगळ-राहूच्या तडक्‍याचा लाल रस्सा चटका किंवा झटका देणार नाही !

धाडस नको, दिनक्रम राखा
मेष :
सप्ताहात ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट थोडीशी बदलतेय ! नका मारू चौकार-षटकार. दिनक्रम चालू ठेवून सिंगल धावाच काढा. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींनी कौटुंबिक जीवनातील भावबंध जपावेत. ता. १७ व १८ हे दिवस मानसिक त्रासाचे आहेत ! कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी शनिवार बॅड डे.

मुलाखतींमध्ये यश लाभेल
वृषभ :
शुक्र-नेपच्यून योगाची पार्श्‍वभूमी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाच्या सुरुवातीस ओळखी - मध्यस्थीतून चमत्कार घडवेल. ता. १५ चा दिवस मुलाखतीमध्ये यशस्वी करणारा. ता. १७ ला विचित्र घटनांतून दिनक्रम विस्कटला जाईल. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींनी विशेषतः नवपरिणितांनी आपल्या प्रोबेशन पीरियडमध्ये घरी व दारी जपावं.

साहेबांची मर्जी संपादन कराल
मिथुन :
सप्ताह चिंतन, मननासाठी चांगलाच. अहंकारी व्यक्तींचा सहवास टाळा. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाची सुरुवात नोकरीविषयक बाबींतून छानच. साहेबांची मर्जी संपादन होईल. आर्द्रा नक्षत्रास ता. १७ व १८ हे दिवस खर्च वा नुकसानींतून हैराण करणारे. शनिवारी गुप्त चिंतेचा काळ.

शिक्षण, नोकरीत चांगल्या संधी
कर्क :
रवी-शुक्राची राश्‍यंतरे परिणाम साधतील. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १५ व १६ हे दिवस शिक्षण, नोकरी वा विवाह माध्यमांतून सिक्वेन्स लावणारे. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १७ व १८ हे दिवस मानवी उपद्रव देतील. गैरसमज टाळा. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार सूर्योदयी अशांततेचा.

परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय
सिंह :
रवी-शुक्राच्या राश्‍यंतरातून ग्रहांची फिल्ड ॲरेंजमेंट बदलत आहे. नोकरीतील राजकारणात पडू नका. बाकी ता. १५ व १६ हे दिवस मोठ्या वैयक्तिक सुवार्तांचे. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. व्हिसा मिळेल. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना मोठी व्यावसायिक प्राप्ती. शनिवार एकूणच मानवी उपद्रवाचा. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना  
कलहजन्य त्रास.

आर्थिक सुरक्षितता मिळेल
कन्या :
सप्ताहात राशींच्या एक्‍स्चेंजमध्ये आपला शेअर वधारणार आहे. विवाहेच्छुंनी आपले प्रेमाचे अँटिने स्वच्छ ठेवावे. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींना कालखंड झळाळी घेईल. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात आर्थिक सुरक्षितता देईल. जुन्या गुंतवणुकी फलद्रूप होतील. ता. १७ चा दिवस विचित्र दुखापतींचा. सावध राहा.

नोकरीत प्रसन्नता लाभेल
तूळ :
अतिशय संमिश्र स्वरूपाचे ग्रहमान राहील. तरुणांनी काल्पनिक भयभीतीतून येणारे नैराश्‍य टाळावे. सत्‌संगातच राहा. सार्वजनिक बाबींत नाक खुपसू नका. बाकी विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात नोकरीत प्रसन्न राहील. ता. १८ चा दिवस स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींसाठी गुरुकृपेचा. मात्र शनिवार सूर्योदयी अशांततेचा.

गुरुकृपा होईल, गॉडफादर मिळेल
वृश्‍चिक :
ज्येष्ठा नक्षत्रास शुक्रभ्रमणाची विशिष्ट स्थिती सप्ताहाच्या सुरुवातीस व्यावसायिक मोठा लाभ देऊन जाईल. अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार गुरुकृपेचा. एखादा गॉडफादर भेटेल. बाकी ता. १७ व १८ हे दिवस अकारण मानवी उपद्रव देणारे. शनिवारी श्‍वानदंश सांभाळा.

संमिश्र कालखंड, सांभाळून राहा
धनू :
सप्ताह संमिश्र ग्रहमानाचाच. शुक्राचे राश्‍यंतर मूळ नक्षत्राच्या व्यक्तींना सुगंधित झुळका देईलच! परंतु मंगळ-राहूचा व्हायरस विचित्र संग घडवू शकतो. अपरिचित व्यक्तीशी सांभाळून राहा. ता. १९ चा दिवस बॅड डे राहील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार मोठा शुभलक्षणी. शनिवार खर्चाचा. खरेदीत जपा.

आश्‍वासक कालखंड, चिंता दूर होईल
मकर :
सध्या आपल्या राशीवर ग्रहांचे पूर्णपणे लक्ष आहे. सद्‌भक्तांना ग्रह धावा काढूनच देत आहेत! उत्तराषाढा नक्षत्राच्या तरुणांना अतिशय आश्‍वासक ग्रहमान. मुलाखती द्याच. सप्ताहात व्हिसा मिळेल. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १८ चा दिवस छान, मोठी चिंता दूर होईल. शनिवारी लहान मुलांना जपा.

मुलाखतींमध्ये प्रभाव टाकाल
कुंभ :
सप्ताह सुरुवातीस शुक्रभ्रमणाच्या विशिष्ट स्थितीतून तरुणांना ऑनलाइन क्‍लिक होणारा. मुलाखतीतून प्रभाव टाकाल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठ्या भाग्याचा. शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १९ व २० हे दिवस अकारण गैरसमज आणि वाद निर्माण करणारे. घरातील यंत्र, उपकरणं जपा.

व्यावसायिकांना तेजीचा लाभ मिळेल
मीन :
सप्ताहात राशीतील शुक्राचा अध्याय सुरू होईल. तरुणांचे जीवनातील प्युअर सिक्वेन्स लागतील. व्यावसायिकांना तेजीचा अनुभव येईल. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा शुभलक्षणी. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींनी त्वचाविकार सांभाळावे. रेवती नक्षत्राच्या व्यक्तींना शनिवार यंत्रपीडेचा.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT