Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (२६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२१)

श्रीराम भट saptrang@esakal.com

ईश्‍वरीय सौभाग्य प्राप्त करू या !

आपली संस्कृती विशिष्ट आध्यात्मिक तत्त्वांचे अनुसरण करत जगत आली आहे. जग ही जगू पाहणारी एक शुद्ध जाणीव आहे. किंबहुना जग हे एक डोंगरावरील उमलत्या फुलाप्रमाणे कोणतीही अपेक्षा न ठेवता फुलणारे किंवा सुगंध देणारे एक उत्कट किंवा उन्नत अशा जाणिवेचं स्पंदन आहे. यालाच चैतन्य म्हणतात किंवा ज्ञप्तिमात्र अशी चैतन्याची अधिसत्तासुद्धा म्हणतात. या जगातील पंचमहाभूतांचा आविष्कार म्हणजेच चैतन्याचा साक्षीभूत असाच आविष्कार आहे.

नाना काष्ठी नाव मिळे। ते नावाडेनि चळे।

चालविजे अनिष्ठे। उदक तें साक्षी।।

- ज्ञानदेव

माणूस नावाची एक इच्छा या जगात जगत असते. माणूस ही एक इच्छाच माणसाला पंचमहाभूतांचा आश्रय घेत अनंत जन्म घ्यायला लावत असते ! ही इच्छाच माणसाचं आंतर्बाह्य व्यापून आपली नाव या प्रपंचाच्या महासागरात वाहून नेत असते म्हणे ! वास्तविक पंचमहाभूतांचं वळलेलं हे शरीर ही एक नावच आहे आणि अर्थातच ही नाव पंचमहाभूतांच्या साक्षीतून किंवा सहकार्यातूनच वाहवली जात असते ! माणसाचे एटीएमसारखे असलेलं विषयविज्ञान यंत्र हा एक पंचमहाभूतांचा खेळ आहे आणि या पंचमहाभूतांच्या एटीएम कार्डावर आपले स्वामित्व गाजवणारा माणूस एक अजब प्राणी आहे.

मित्रहो, जगात जगणारं जीवचैतन्य हे ईश्‍वरचैतन्यच आहे. याची जाणीव होणं म्हणजे मनाचा लय होणं होय. हा महालय म्हणजेच पितृपंधरवडा होय. अशा या पितृपंधरवड्यात ता. ३० सप्टेंबरच्या गुरुवारी अविधवा नवमी येत आहे. आपल्या पती परमेश्‍वराच्या जगाला विणारी ही ईश्‍वरी नावाची पतिव्रता आपल्या पती परमेश्‍वराच्या जगाच्या पालनपोषणाचे व्रत अंगीकारते. अशा या अविधवेच्या नवमीनंतर इंदिरा एकादशी येत असते. यंदा अविधवा नवमी गुरूपुष्यामृत योगावर येत आहे. अशा या अविधवा नवमीचे ऋण फेडून आपण ईश्‍वरीय अखंड सौभाग्य प्राप्त करू या!

नव्या ओळखी लाभदायक

मेष : सप्ताहात बलवान चंद्र शुभ ग्रहांच्या योगांतून मस्त फळे देईल. सकारात्मक राहा. भूतकाळ आठवू नकाच. अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींना नव्या ओळखींतून लाभ. ता. ३० आणि १ हे दिवस एकूणच मोठे प्रवाही. भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बलवत्तर विवाहयोग. बॅंकेची कामे होतील. कृत्तिकाचा सन्मान.

तरुणांच्या समस्या संपतील

वृषभ : सप्ताह व्यावसायिक तेजी ठेवेल. ता. २७ चा सोमवार तरुणांचे भाग्योदय करेल. ता. २९ ची कालाष्टमी गाठीभेटींतून उत्तम फलदायी होणारी. मृग नक्षत्राच्या व्यक्तींची व्यावसायिक वसुली होईल. रोहिणी नक्षत्रास शुक्रवार घरातील तरुणांचे प्रश्‍न मिटवणारा. कृत्तिका नक्षत्रास उत्तम नोकरी मिळेल.

व्यवसायात यश मिळेल

मिथुन : सप्ताहात बुध-शुक्राचे फिल्ड राहील. व्यावसायिक मार्केटिंग यशस्वी होईल. ता. २८ ते ३० हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० चा गुरूपुष्यामृत पुत्रोत्कर्षातून धन्यता देणारा. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखीतून विवाहप्रस्ताव येतील. पितृपंधरवडा आड आणू नका. ठरवून टाका.

वास्तुयोगाचा कालखंड

कर्क : चतुर्थातील शुक्रभ्रमण गृहसौख्याच्या बाबतीत मंद-मंद झुळकांतून आनंद देईल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्ती जीवनातील उत्तम ट्रॅक पकडतील. ता. ३० चा गुरुवार एकूणच शुभसंबंधित. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहाचा शेवट वास्तुयोगाचा. पुष्य नक्षत्राचा सन्मान. सरकारी कामे.

महत्वाच्या गाठीभेटी कराच

सिंह : सप्ताहातील ग्रहांचे फिल्ड बुद्धिजिवी मंडळींना फारच सुंदर. बुध-शुक्राचे ग्रासकोर्ट राहील. महत्त्वाच्या गाठीभेटी कराच. पितृपंधरवड्याचे सावट नको. मघा आणि उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींस ता. २९ व ३० हे दिवस अतिशय प्रवाही आणि यश देणारे. पूर्वा नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार मोठा यशस्वी व गोड.

जनसंपर्कातून भाग्यबीजे पेरली जातील

कन्या : व्यावसायिकांना सप्ताह सतत हसत खेळत ठेवेल. बुध-शुक्राचे ग्रासकोर्ट तेजीची टवटवी ठेवेलच. सप्ताह मार्केटिंगला अतिशय उत्तम. मास्क लावून बाहेर पडाच. चित्रा नक्षत्रास ता. २७ ते ३० हे दिवस जनसंपर्कातून भाग्यबीजे पेरतील. हस्त नक्षत्राच्या व्यक्तींना सरकारी व कायदेशीर कामांतून यश.

सरकारी कामे होतील

तूळ : सप्ताहात ग्रहांचे फिल्ड तरुणांना त्यांच्या उपक्रमांतून यश देणारे. बेरोजगारांना दिलासा मिळेल. विशिष्ट शैक्षणिक चिंता जाईल. बाकी व्यावसायिकांना ता. २८ ते ३० हे दिवस प्रसन्नच ठेवतील. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींना अपवादात्मक मोठे लाभ. सरकारी कामे मिळतील. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना ओळखींतून विवाहप्रस्ताव.

थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठा दिलासा

वृश्‍चिक : सप्ताहात आहे ती परिस्थिती सांभाळा. मोहात पडू नका. आहे ती नोकरी सोडू नका. बाकी अनुराधा नक्षत्राच्या व्यक्तींच्या सप्ताहाचा आरंभ आणि शेवट मोठ्या प्राप्तीचा. बॅंकेची कामे होतील. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना थोरामोठ्यांच्या सहकार्यातून मोठा दिलासा. नवपरिणितांना दैवी प्रचिती. उपासनेला दृढ चालवावे.

वाडवडिलांचे आशीर्वाद फलद्रूप होतील

धनु : सप्ताह राशीतील गुरू-शनीच्या अधिष्ठानातून पूर्वसुकृत फळास आणणाराच. वाडवडिलांचे आशीर्वाद फलद्रूप होतील. मूळ नक्षत्राच्या व्यक्ती याचा अनुभव घेतील. ता. २८ ते ३० हे दिवस मोठे नावीन्यपूर्ण. पूर्वाषाढा नक्षत्राच्या व्यक्तींची प्रतीक्षा संपेल. घरातील तरुणांचे प्रश्‍न मिटतील. उत्तराषाढा नक्षत्रास नोकरीत बढती.

चांगली नोकरी मिळेल

मकर : सप्ताहात एक मोठा आत्मविश्‍वास येईल. साडेसातीला कधीही नावं ठेवू नका. सप्ताह पूर्वसुकृतातून फळं देणारा. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्ती याचा पूर्ण अनुभव घेतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींना ता. ३० चा गुरुवार गुरूकृपेचा! उत्तराषाढा नक्षत्रास छान नोकरी मिळेल.

बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ होतील

कुंभ : राशीचा नेपच्यून कनेक्‍टिव्हिटीचा प्रॉब्लेम ठेवणार नाही आणि बुधाची विशिष्ट स्थिती बुद्धिचातुर्यातून मोठे लाभ देईल. ता. २९ व ३० या दिवसांत पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्ती फ्लॅश न्यूजमध्ये येतील. अर्थातच सुवार्तांतून धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून इम्युनिटी डोस! शततारका नक्षत्राच्या लोकांची गुप्त आरोग्यचिंता जाईल.

तरुणांचे प्रश्‍न मार्गी लागतील

मीन : सप्ताहात आहे ते जपा ! तेच मिळवण्यासारखे आहे ! बाकी सप्ताहात वैवाहिक जीवनातील प्रश्‍न सुटतील. सप्ताह घरातील तरुणांचे प्रश्‍नसुद्धा मार्गी लावेल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. २९ ची अष्टमी कर्जमुक्त करणारी. रेवती नक्षत्राच्या व्यक्तीसाठी ता. ३० चा गुरूपुष्यामृत योग भाग्यबीजे पेरणारा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT