Weekly Horoscope
Weekly Horoscope Sakal
सप्तरंग

साप्ताहिक राशिभविष्य (३० मे २०२१ ते ६ जून २०२१)

श्रीराम भट saptrang@esakal.com

गीतेचं घोषवाक्‍य ध्यानात ठेवा !

बौद्धिक आणि भावनिक पातळीवरून बुद्‌ध्यांक मोजण्याचं वा मापण्याचं एक तंत्र सध्या विकसित होऊ पाहत आहे. यालाच इंग्लिशमध्ये आयक्‍यू आणि ईक्‍यू संबोधलं जातं. माणसाचा विचार त्याच्या बुद्धीचा स्पर्श पकडत प्रकट होत असतो. त्यामुळंच माणूस हा एक विचार आहे आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, माणूस ही एक भावना आहे आणि त्या भावनेचा स्पर्श घेऊन चाललेलं माणूस म्हणजे हे एक नित्य चिंतन आहे. विचार प्रकट होणं आणि भावना प्रकट होणं किंवा त्यांचे प्रकट होण्याचे मार्ग अतिशय परस्परभिन्न आहेत. विचार शब्दांत व्यक्त करता येतात; परंतु भावना शब्दांत व्यक्त करता येतेच असं नाही! भावस्पर्श आणि शब्दस्पर्श यांत जो फरक आहे, तोच इंटलिजिएन्ट कोशन्ट (IQ) आणि इमोशनल कोशन्ट (EQ) मध्ये आहे. बुद्धिमान असलेला माणूस भावनाप्रधान नसेल तर तो विकृत होण्याचा मोठा धोका निर्माण होत असतो. भावना आणि बुद्धी यांचा उत्तम समन्वय झाल्यानंतर माणसाच्या जीवनात श्रद्धा निर्माण होते आणि हीच श्रद्धा माणसाला खरं आत्मज्ञान प्राप्त करून देते! म्हणूनच खरा बुद्धिमान माणूस न शिकलेल्या मातापित्यांना मातृदेवो भव, पितृदेवो भव अशीच श्रद्धा ठेवत नतमस्तक होत असतो !

मित्र हो, सध्याच्या आधुनिक जगतात माणसाचा बुद्‌ध्यांक (IQ) तांत्रिकदृष्ट्या प्रचंड आहे; परंतु सध्या माणसाचा भावनिक बुद्‌ध्यांक पार तळाला जात आहे! त्यामुळंच माणसाची विकृती वाढली आहे. माणूस भावनाहीन झालाय. विकृतीमुळं माणसाचा संशय वाढलाय, तसंच विचित्र भय, विकृत अहंकार आणि विकृत काम-क्रोध इत्यादींच्या मोठ्या प्रादुर्भावामुळं माणूस पिशाच्चवत होतोय! सध्या हर्षल मेष राशीत एका विशिष्ट ग्रहयोगातून जात आहे. ता. २ जून रोजी मंगळ कर्क राशीत येईल. त्यामुळंच या विशिष्ट ग्रहस्थितीत मानवी समूहातील बुद्धी आणि भावना यांच्यातील समन्वय नष्ट होऊन मनोविकृती मोठ्या प्रमाणात जोर पकडतील अशी चिन्हं दिसताहेत. त्यामुळंच ‘श्रद्धावान लाभते ज्ञानम्’ हे गीतेचं घोषवाक्य सतत आपल्या ध्यानीमनी असू दे!

संसाराचं मर्म शोधा

मेष : सप्ताहात शनी आणि हर्षल या ग्रहांची स्थिती मोठी ऐतिहासिक राहील. संसाराचं मर्म शोधण्याचा प्रयत्न करा. आहे ते सांभाळा आणि आत्मविश्‍वास अबाधित ठेवा. कोरोनापेक्षा माणसांचा व्हायरस सांभाळा. उद्याचा सोमवार भरणी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी बॅड डे. बाकी अश्‍विनी नक्षत्राच्या व्यक्तींसाठी ता. १ व २ हे दिवस शिक्षण, विवाह आणि नोकरी माध्यमांतून ऑनलाइन क्‍लिक होणारे. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्तींनी जुगार टाळा.

नोकरी-व्यवसायात मोठे लाभ

वृषभ : सप्ताह पूर्णपणे शुभ ग्रहांच्या ताब्यातला. नोकरी- व्यवसाय क्षेत्रात मोठे लाभ अपेक्षित आहेत. कृत्तिका नक्षत्राच्या व्यक्ती प्रचंड फॉर्मात येतील. १ ते ३ हे दिवस चढत्या क्रमाने शुभ. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना परदेशी लाभ. सप्ताहात जुन्या गुंतवणुकीतून फलदायी होणारा कालखंड. रोहिणी नक्षत्राच्या व्यक्तींना मातृपितृचिंता सतावेल. सोमवार बेरंगाचा.

दैवी प्रचितीचा अनुभव येईल

मिथुन : राशीतील शुक्राचं आगमन ग्रहांचा पट ताब्यात घेईल. प्रेमिकांनो अँटिने सज्ज ठेवा. कनेक्‍टिव्हिटी साधाच. मृग नक्षत्राच्या व्यक्तींना शिक्षण, विवाह, नोकरी वा परदेशगमन या माध्यमातून ऑनलाइन क्‍लिक होणारे. ता. १ ते ३ हे दिवस आर्द्रा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी सप्ताहात नातेवाइकांचा त्रास. पुनर्वसू नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल.

शॉर्टकट नकोतच, गुप्त चिंता संपतील

कर्क : शनी आणि हर्षल ग्रहांची पूर्णपणे व्यूहरचना राहील. कोणतेही शॉर्टकट टाळाच. कोणाच्याही आहारी जाऊ नका. उद्याचा सोमवार एक अतिशय प्रदूषित दिवस राहील. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींना मातृपितृचिंता भेडसावेल. आश्‍लेषा नक्षत्राच्या व्यक्तींना शुक्रवारचा दिवस अतिशय छान. तरुणांना नोकरीसाठी मुलाखतींची संधी. पुष्य नक्षत्राच्या व्यक्तींची गुप्तचिंता जाईल.

एखादी महत्त्वाकांक्षा पूर्णत्वास जाईल

सिंह : सप्ताहात गुरू आणि शुक्र या ग्रहांचं अधिष्ठानच राहील. मघा नक्षत्राच्या व्यक्तींना नक्षत्रलोकांतून उत्तम लाभ. एखादी महत्त्वाकांक्षा पूर्ण होईल. ता. १ ते ३ हे दिवस एकूणच आपल्या राशीस चढत्या क्रमाने शुभ. मात्र उद्याचा सोमवार शत्रुत्वाच्या पार्श्‍वभूमीवर सांभाळा. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्तींनी गैरसमज टाळा.

मुलाखती यशस्वी होतील

कन्या : सप्ताह नोकरी- व्यावसायिक पार्श्‍वभूमीवर उत्तमच. उत्तरा नक्षत्राच्या व्यक्ती सुवार्तांतून फ्लॅश न्यूजमध्ये येतील. मुलाखती यशस्वी होतील. चित्रा नक्षत्राच्या व्यक्ती सप्ताहात चांगलाच भाव खातील. परदेशस्थ तरुणांचे भाग्योदय. शनिवारी स्त्रीवर्गाची मनं जपा. स्त्रीवर्गानं पतिराजांना समजून घ्यावं.

करिअरच्या आघाडीवर चांगला काळ

तूळ : सप्ताह परस्परविरोधी ग्रहमानाचाच वाटतो. वृद्धांनी वार्धक्‍यातील चिकित्सकपणा टाळावा. घरातील नवपरिणितांची मनं जपा. बाकी सप्ताहात गुरू-शुक्राच्या स्थितीतून तरुणांना उत्तम लाभ. ता. १ ते ३ हे दिवस चित्रा नक्षत्राच्या व्यक्तींना करिअरच्या धावपट्टीवर चांगलेच. स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना उद्याचा सोमवार अंतःकरण दुखावणारा.

राजकारण्यांनी जपून धोरण ठरवावं

वृश्‍चिक : सप्ताहात आपलं सोशल नेटवर्क जपा. अर्थातच कोणाला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दुखावू नका. सप्ताहात राजकारणी मंडळींनी घरी वा दारी सांभाळावंच. बाकी ता. ३ व ४ हे दिवस शुभ ग्रहांच्या अखत्यारीतले. गुंतवणुकीतून लाभ. विशाखा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पुत्रोत्कर्ष. ज्येष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना दैवी प्रचिती येईल.

शैक्षणिक क्षेत्रात भाग्योदय

धनू : सप्ताहात गुरू-शुक्राची फिल्ड ऍरेंजमेंट राहील. मूळ नक्षत्राच्या व्यक्तींनी याचा लाभ घ्यावाच. ता. १ ते ३ हे दिवस जीवनात मॅजिक घडवतील. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींचा शैक्षणिक भाग्योदय. उच्चशिक्षणाच्या संधीतून लाभ. पूर्वाषाढा व्यक्तीस उद्याचा सोमवार बेरंगाचा. सोशल मीडिया सांभाळा.

ओळखीतून लाभ होईल

मकर : राशीतील शनिमहाराजांचं अधिराज्य मानलंच पाहिजे. सप्ताह उपद्‌व्यापी मंडळींना खराबच. बाकी तरुणांना गुरू-शुक्र शुभयोगाची पार्श्‍वभूमी. ता. १ ते ३ या दिवसांत विशिष्ट ओळखींतून लाभ देईल. उत्तराषाढा नक्षत्राच्या व्यक्तींना लाभ होतील. श्रवण नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार बॅड डे. आर्थिक व्यवहारातून त्रास. वास्तुचिंता. धनिष्ठास स्त्रीचिंता.

वास्तुविषयक व्यवहारातून लाभ

कुंभ : सप्ताहात गुरू-शुक्राचं उत्तम फिल्ड राहील. मात्र उद्याचा सोमवार सर्व प्रकारांतून जपा. नोकरीत सांभाळा. बाकी शततारका नक्षत्राच्या व्यक्तींसाठी पुत्रोत्कर्षातून सप्ताह संवेदनशीलच. धनिष्ठा नक्षत्राच्या व्यक्तींना ता. १ ते ३ हे दिवस जीवनात मॅजिक घडवणारे. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींना वास्तुविषयक व्यवहारांतून लाभ.

नोकरीत फायदा होईल

मीन : उमलत्या तरुणांना सप्ताह सुगंधी झुळका देईल. सप्ताहात रेवती नक्षत्राच्या व्यक्ती कात टाकतील. सप्ताहात नोकरीतील विशिष्ट परिस्थितीचा फायदा उठवाल. वैवाहिक जीवनातून सुवार्ता धन्य करतील. पूर्वाभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींचं वास्तुस्वप्न पूर्ण होईल. उत्तराभाद्रपदा नक्षत्राच्या व्यक्तींसाठी उद्याचा सोमवार वस्तू हरवण्याचा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT