Bori Bar Festival  esakal
सातारा

Khandala : शिव्यांच्या लाखोलीत रंगला बोरीचा बार; खंडाळा तालुक्‍यात जपली जातेय अनोखी परंपरा, काय आहे खासियत?

Bori Bar Festival : कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा अथवा वाईट प्रथा नसल्याचे या दोन्ही गावांतील महिला व ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

सकाळ डिजिटल टीम

या वेळी हातात कडुलिंबाचे डहाळे घेऊन अनेकींना खांद्यावर उचलून घेऊनही बार घालण्यात आला. मात्र, अधूनमधून चटकणाऱ्या उन्हामुळे बार घालणाऱ्या महिला चांगल्याच घामाघूम झाल्या होत्या.

लोणंद : चोहीकडे हिरवागार निसर्ग, ऊन सावल्यांचा खेळ, ओढ्यातून खळाळणारे गुडघाभर पाणी अशा उत्साही वातावरणात खंडाळा तालुक्यातील प्रसिद्ध ‘बोरीचा बार’ (Boricha Bar) दर वर्षीच्या प्रथेनुसार यंदाही पाऊणतास भरला.

डफ, शिंग, सनई व ताशांच्या निनादात उड्या मारून एकमेकींच्या दिशेने हातवारे करत व टाळ्यांच्या कडकडाटात हुर्रे म्हणत शिव्यांची लाखोली वाहत बोरीचा बार साजरा झाला. यावेळी हा बार पाहण्यासाठी ओढ्याच्या दोन्ही तिरावर महिला व नागरिकांनी गर्दी केली होती.

खंडाळा तालुक्यातील बोरी व सुखेड या दोन गावांतील महिलांनी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी या दोन्ही गावच्या मध्यातून वाहणाऱ्या ओढ्याकाठी येऊन हातवारे करत एकमेकींना शिव्या देण्याचा ‘बोरीचा बार’ ही प्रथा येथे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन महिलांचे पारंपरिक झिम्मा, फुगडी, फेर आदींसारखे खेळ, तसेच पारंपरिक गाणी सादर करण्‍याचा महोत्सव येथे भरतो.

या वर्षीही या दोन्ही गावांतील महिलांनी साज शृंगार करून वाद्यांच्या गजरात येथील ओढ्याकाठी जमून जोशात एकमेकांना शिव्यांची लाखोली वाहण्‍याचा आनंद लुटला. या वेळी हातात कडुलिंबाचे डहाळे घेऊन अनेकींना खांद्यावर उचलून घेऊनही बार घालण्यात आला. मात्र, अधूनमधून चटकणाऱ्या उन्हामुळे बार घालणाऱ्या महिला चांगल्याच घामाघूम झाल्या होत्या. दोन्हीकडे सहाशे ते सातशे महिला बार घालण्यासाठी उपस्थित होत्या.

सकाळी सव्वाबारा वाजता सुरू झालेला बार एक वाजता बंद झाला. पोलिस व ग्रामस्थांनी वाद्य बंद करून दोन्हीकडील महिलांना मागे हटविले. त्यानंतर या दोन्ही गावांतील महिला पुन्हा वाजत गाजत आपापल्या गावात गेल्या. येथे ओढ्याकाठी मिठाईवाले, खेळणीवाले यांनीही आपली दुकाने मोठ्या संख्येने थाटल्याने येथे यात्राच भरली होती. लोणंदचे सहायक पोलिस सुशील भोसले यांनी महिला व पुरुष पोलिस कर्मचाऱ्यांची जादा कुमक मागवून चोख बंदोबस्त ठेवला होता. बोरी येथील अमरदीप क्रीडा मंडळाने या निमित्ताने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्‍पर्धाही उत्‍साहात झाल्‍या.

अंधश्रद्धा नव्‍हे, तर आनंदोत्‍सव

कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा अथवा वाईट प्रथा नसल्याचे या दोन्ही गावांतील महिला व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या दोन्ही गावांतील महिला, मुली, तसेच परगावी असलेल्या माहेरवाशिनी, महिला न चुकता दर वर्षी बोरीच्या बारासाठी हजेरी लावतात. शिकल्या सवरल्या सुशिक्षित मुली, महिलांचाही बार घालण्यासाठी मोठा सहभाग असतो. बार पाहाण्यासाठी बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्याही मोठी असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : स्पेसपासून चेसपर्यंत! गुगल डूडलने कसा साजरा केला भारताचा स्वातंत्र्यदिन? पाहा एका क्लिकवर

Viral Video : नोटा मोजताना राहा सावधान, नाहीतर लागू शकतो चुना, नव्या स्कॅमचा व्हिडिओ व्हायरल

Buldhana Farmers: नुकसान भरपाई मेल्यावर देणार का? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा सरकारला संतप्त सवाल

PCMC News : डिजिटल पेमेंट सुविधेअभावी नागरिक त्रस्त, महापालिका रुग्णालयांत रोख रक्कम बाळगणे भाग; उपचारांत विलंब

Ravet Pollution : रावेत, आकुर्डीत धूलिकणांच्या प्रमाणात वाढ; प्राधिकरण, निगडी, किवळे भागांतही त्रास, आरोग्यावर दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT