karad
karad sakal
सातारा

पंतप्रधान आवास योजनेतील कर्मचाऱ्यांची पैशांची मागणी ; नागरिकांची तक्रार

(शब्दाकंन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : शहरी पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांना शासनाचे मंजुर झालेले अनुदान देण्यासाठी पालिकेने नेमलेला कंत्राटी कर्मचारी पैशाची मागणी करत आहे. त्याची सखोल चौकसी करावी, अशी मागणी युवा नेते शिवराज इंगवले यांनी मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे. चौकशीची मागणी करण्यापूर्वी अनुदान आले आहे का, आले असेल तर ते द्यावे, त्याची चौकशी . इंगवले यांना संबधीत कर्मचाऱ्यांकडे केली होती. त्यावरून दोघांमध्ये शाब्दीक चकमकही झाली होती. त्यानंतर श्री. इंगवले यानी त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात तक्रार दिली आहे. मुख्याधिकारी डाके त्याची चौकशी करणार आहेत.

गरीबांसाठी शासनाने शहरी पंतप्रधान आवास योजना सुरू केली आहे. योजनेतंर्गत लाभार्थ्यांना शासन अनुदान देते. त्या योजनेच्या कामासाठी पालिकेने कंत्राटी कर्मचारी नेमला आहे. लाभार्थ्यांना अनुदान देण्यासहीत लाभार्थ्यांची अडचण दूर करण्याची जबाबदारी त्या कंत्राटी कर्मचाऱ्याकडे आहे. मात्र येतील कंत्राटी कर्मचारी शासनाचे आलेले अनुदान लवकर देत नसल्याची व अनुदान वाटपासाठी कमीशन मागत असल्याची तक्रार लाभार्थ्यांनी तोंडी मुख्याधिकाऱ्यांकडे केली होती. त्यावेळी संबधीत कर्मचाऱ्याला सुनावण्यात आले होते. तरिही संबधी कर्मचाऱ्याने आज त्या लोकांना पैसे मागितले.

ते लाभार्थी श्री. इंगवले यांच्याकडे गेले. त्यावेळी इंगवले त्या कर्मचाऱ्यांना विचारण्यास गेले असता दोघात शाब्दीक चकमक झाली. पालिकेतच प्रकार झालेल्याने प्रकाराची चर्चा होती. श्री. इंगवले यांनी त्या कर्मचाऱ्याच्या विरोधात मुख्याधिकारी डाके यांच्याकडे लेखी तक्रार दिली. श्री. इंगवले यांनी केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पंतप्रधान आवास योजनेसाठी नियुक्त केलेला कंत्राटी कर्मचारी लाभार्थ्यांशी उद्धट बोलतो. त्यांची कामे करण्यासाठी पैशाची मागणी करतो. पैसे देवूनही काम करत नाही. कोणी विचारल्यास उलट उत्तरे देवून त्यांचे अनुदान देण्याचे थांबवतो. त्यांची वेळोवेळी तोंडी तक्रार पालिकेत दिली आहे. मात्र त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. यावेळी आम्ही लेखी तक्रार देत आहोत. त्या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या कंत्राटी कर्मचाऱ्यास योग्य ते सासन करावा. अन्यथा आम्ही सर्व लाभार्थ्यांना घेवून आंदोलन करण्याच्या तयारीत आहोत, याची पालिकेने नोंद घ्यावी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

Pune Traffic Update: उद्यापासून पुणे वाहतुकीत गर्डर लॉचिंग कामामुळे मोठे बदल, कोणते असतील पर्याय मार्ग?

Kapil Sharma : 'द ग्रेट इंडियन कपिल शो'साठी कपिल शर्मा घेतो 'इतकं' मानधन !

Chitra Wagh: "चित्रा वाघ यांनी माफी मागावी अन्यथा..."; 'पॉर्नस्टार' प्रकरणावर अभिनेत्याचा गंभीर इशारा

RBI: गुंतवणूकदार मालामाल! रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत

SCROLL FOR NEXT