Devotees Vithu Mauli Shri Brahma Chaitanya Maharaj Gondwala today satara sakal
सातारा

श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे कुलदैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागून राहिलेले भाविक आज गोंदवल्यात

ज्ञानोबा माऊलीसह श्रीरामाचा जयघोष होताच टाळ मृदंगचा ठेका टिपेला पोचला अन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आल्या.

फिरोज तांबोळी

गोंदवले : ज्ञानोबा माऊलीसह श्रीरामाचा जयघोष होताच टाळ मृदंगचा ठेका टिपेला पोचला अन श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पादुका फुलांनी सजविलेल्या रथात विराजमान करण्यात आल्या. गोंदवलेकरांची गळाभेट घेऊन विठुरायाच्या भेटीला निघालेले वारकरी आज सकाळी पंढरपूरकडे मार्गस्थ झाले. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे कुलदैवत असलेल्या विठू माऊलीच्या दर्शनाची आस लागून राहिलेले भाविक आज गोंदवल्यात भक्तिभावाने तृप्त झाल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे दोन वर्षानंतर निघालेल्या आषाढी वारीत यंदा वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसली.

दिंडीत सहभागी होण्यासाठी काळापासूनच गोंदवल्यात गर्दी होऊ लागली होती.सकाळी समाधी मंदिरात भक्तीचा महापूर आला होता.प्रथेनुसार आजही वारकऱ्यांनी मंदिरात पिठलं भाताचा आस्वाद घेतला.मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते श्रींच्या पादुकांचे पूजन झाल्यावर श्री अनंतकोटी ब्रह्मणांडनायक... च्या जयघोषात श्रींच्या पादुका मंदिरातून निघाल्या.फुलांनी सजविलेल्या रथात श्रींच्या पादुका विराजमान करण्यात येताच वारकऱ्यांनी केलेल्या श्रीरामनामाबरोबर ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषाने परिसरात अधिकातच भक्तिरस न्हावून निघाला.विश्वस्तांनी श्रींच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर मंदिरातून रथ मार्गस्थ झाला. रथापुढे हलगीच्या तालावर पताकाधारी वारकऱ्यांसह बत्ताशा घोडा ताल धरून नाचत होता.मुख्य रस्त्यावरून ही दिंडी गावातील थोरले श्रीराम मंदिराजवळ आल्यावर सरपंच जयप्रकाश कट्टे यांनी पादुका व प्रतिमा पूजन केले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

येथे आरती व भजन झाल्यानंतर पुन्हा ही दिंडी वैभव चौकातून मुख्य रस्त्यावर आली. गावाच्या वेशीवर ग्रामस्थांनी वारकऱ्यांची गळाभेट घेत निरोप घेतला अन वारीसाठी निघालेली श्रींची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. दरम्यान वारकऱ्यांच्या सेवेसाठी ग्रामस्थांसह भाविक जागोजागी फराळ,दूध,तसेच पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करत होते.गावोगावच्या दिंड्या देखील श्रींच्या दिंडीत सहभागी झाल्या आहेत.विशेषतः साताऱ्यासह सांगली,कोल्हापूर, पुणे,नगर,सोलापूर भागातूनही वारकरी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले आहेत.या वारकऱ्यांच्या सेवेसाठी समाधी मंदिर समितीसह वारकरी मंडळाने उपाययोजना केल्या आहेत.आज दिंडीचा पहिला मुक्काम म्हसवड येथे होणार असून पिलीव व भाळवणीच्या मुक्कामानंतर दिंडी आठ जुलैला पंढरपुरात पोचणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Mitkari: ‘भूमिपुत्रांना रोजगार द्या, त्यांचं आयुष्य समृद्ध करा’; आ. अमोल मिटकरी यांची विधान परिषदेत ठाम मागणी

Manoj Kayande : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्या; आमदार मनोज कायंदे यांची अधिवेशनात मागणी

KDMC Revenue Department : कल्याण - डोंबिवली खाडी किनारी महसूल विभागाची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल केला नष्ट

"मृत्युपत्र तयार ठेवलंय" एअर इंडियाने प्रवास करणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल, म्हणाला..

Latest Maharashtra News Updates : सोमनाथच्या मृत्यू संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT