dhanajay munde
dhanajay munde esakal
सातारा

पुढचा मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा, राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पदाचे वेध

सकाळ वृत्तसेवा

पळशी - ‘राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार,’ असे चंद्रकांतदादा म्हणत असतील, तर त्यांनाच कदाचित घोडेबाजार सुरू करायचा असेल आणि त्यासाठीच ही निवडणूक लादताहेत, अशी परिस्थिती महाराष्ट्रात सर्वदूर सगळ्यांना वाटतेय, अशा शब्दांत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

येणाऱ्या काळात मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असा दावा त्यांनी केला.

सामाजिक न्यायमंत्री मुंडे आज कोरेगाव मतदारसंघात दौऱ्यावर आले असताना आमदार शशिकांत शिंदे यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. ‘घोडेबाजार होणार,’ असे विधान चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय? या पत्रकारांच्या प्रश्नावर मंत्री मुंडे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. श्री. मुंडे म्हणाले, ‘‘राज्यसभेच्या निवडणुकीचे चित्र आज स्पष्ट होणार होते. ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असे एकंदरीत दिसत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीच्या मतदानात व विधान परिषदेच्या निवडणुकीच्या मतदानात फरक आहे. राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान संबंधित पक्षाच्या गटनेत्याला दाखवून करावे लागते, तसा कायदा आहे. विधान परिषदेसाठी तसे नाही.’’ नगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ करावे, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

मनसेकडून वेगळीच मागणी होत आहे, यावर प्रतिक्रिया विचारली असता, मुंडे म्हणाले, ‘‘कोणी काय मागणी करावी, हा लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार प्रत्येकाला अधिकार आहे. भारतीय जनता पक्षाच्या कोणीही ही मागणी केली असली, ‌तरी ती गैर नाही; परंतु मागच्या पाच वर्षांत नगर जिल्ह्याच्या तत्कालीन मंत्र्यांनीही ही मागणी केली होती.

त्या वेळी मागणी का पूर्ण केली नाही, याचे उत्तर भारतीय जनता पक्षाने दिले, तर बरे होईल. त्यानंतर ही मागणी करावी आणि तसा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारकडे द्यावा.’’ कोणी भोंग्याचा विषय काढतंय, कुणी हनुमान चालिसाचा विषय काढतंय, सर्वच गोंधळ आहे, असा टोला मंत्री मुंडे यांनी मनसेसह भाजपवर लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT