सातारा

धनगर आरक्षणासाठी खंडाळा तहसीलदार कार्यालयासमोर "ढोल बजाओ' आंदोलन

अशपाक पटेल

खंडाळा (जि. सातारा) : धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावे, यासाठी खंडाळा तालुका धनगर आरक्षण कृती समितीकडून शिवाजी चौक ते तहसीलदार कार्यालयापर्यंत ढोल-ताशा व भंडाऱ्याची उधळण करत मिरवणूक काढून तहसीलदार दशरथ काळे यांना निवेदन दिले. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी येथे तालुक्‍यातील धनगर समाजबांधवांनी तहसीलदार कार्यालयासमोर "ढोल बजाओ, सरकार जगाओ' आंदोलन करण्यात आले.

या वेळी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती आनंदराव शेळके, पंचायत समितीचे माजी सभापती रमेश धायगुडे, बापूराव धायगुडे, ऋषिकेश धायगुडे, ऍड. सचिन धायगुडे, ऍड. वैभव धायगुडे, सचिन शेळके, हणमंतराव शेळके, जिजाबा काळे, म्हस्कुआण्णा शेळके, अशोक धायगुडे, शामराव धायगुडे व धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

श्रमिक मुक्ती दलाचे एकाच दिवशी गावागावांत आंदोलन 

शासन दप्तरी धनगर व धनगड या शब्दाचा खेळ करून धनगर समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित अध्यादेश काढून आरक्षण द्यावे, याचबरोबर आरक्षणासंदर्भात मोर्चावेळी दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावेत, आरक्षण आंदोलनावेळी आत्महत्या केलेल्या कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी मिळावी तसेच जाहीर केलेला एक हजार कोटींचा निधी द्यावा व मेंढपाळांना संरक्षण मिळावे आदी मागण्याही निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

साताऱ्यात युवकांनी एटीएममधून चाेरले दोन लाख रुपये
 
दरम्यान, शिवाजी चौक येथून धनगर समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन, ढोल-ताशांच्या निनादात तसेच भंडाऱ्याची उधळण करून तहसील कार्यालयापर्यंत धनगर आरक्षणासाठी मिरवणूक काढली. पंचायत समिती आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यानंतर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार कार्यालयातील प्रवेशद्वारावर तहसीलदार दशरथ काळे यांना धनगर आरक्षण कृती समितीकडून निवेदन देण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT