सातारा

Diwali Festival 2020 दिव्यांगांच्या आकाश कंदिलांनी वाई उजळली!

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : पंचायत समितीच्या समावेशित शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली दिव्यांग विद्यार्थ्यांनी आकर्षक आकाश कंदिलांची निर्मिती केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेले आकाश कंदील पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, सदस्य मधुकर भोसले, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर यांना देण्यात आले. 

अश्विनी जमदाडे, वसुधा जाधवराव, राहुल खडसरे, सारिका भुजबळ, नीता गायकवाड, मयुरा जोशी, उज्ज्वला आवटे यांनी तालुक्‍यातील दिव्यांग विद्यार्थ्यांकडून आकाश कंदील व दिवाळी किट बनवून घेतले. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास घडवून आणून, त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत सभापती व उपसभापती यांनी या वेळी व्यक्त केले. 

विद्यार्थ्यांनी तयार केलेले दिवाळी किट खरेदी करून पदाधिकाऱ्यांनी त्यांना प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना नवनिर्मितीची प्रेरणा मिळण्याबरोबरच त्यांचा आत्मविश्वास या उपक्रमामुळे वाढत असल्याचे प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी सुधीर महामुनी यांनी सांगितले. याप्रसंगी संजय कांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी विष्णू मेमाणे, साईनाथ वाळेकर आदी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT