सातारा

पुणे पदवीधर मतदारसंघातून 'श्रमुद'चे ऍड. कृष्णा पाटील लढणार

सिद्धार्थ लाटकर

सातारा ः पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत घेण्यात आला असून, ऍड. कृष्णा पाटील (तासगाव, जि. सांगली) हे श्रमुदच्या वतीने निवडणूक लढविणार आहेत, अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
 
गेली चाळीस वर्षांहून अधिक काळ श्रमिक मुक्ती दल कष्टकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रस्त्यावरची चळवळ करीत आहे. नवा शोषणमुक्त समाज निर्माण करण्याचे ध्येय बाळगून अनेक लढे यशस्वी केले आहेत. तरुणाईच्या स्वप्नातील नवा भारत आणि पर्यावरणपूरक रोजगाराची नवी मांडणी करीत कृषी औद्योगिक पर्यावरण संतुलित नवे धोरण पुढे आणले आहे.

शिक्षकाचा असाही प्रामाणिकपणा! दिवाळीच्या ताेंडावर हरवलेले पाकीट मिळाले

शैक्षणिक क्षेत्रामध्ये केवळ नोकरदार बनविण्यापुरते शिक्षण न देता नवा भारत घडवण्यासाठी आणि निर्मितीक्षम आणि खात्रीलायक रोजगार घडवण्यासाठी आवश्‍यक शैक्षणिक धोरण घडवण्याची भूमिका मांडली आहे. पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढविणाऱ्या कोणत्याही पक्षाकडे वा त्यांच्या उमेदवाराकडे पदवीधर तरुणाईबद्दल कोणताही ठोस कार्यक्रम नाही.

त्यामुळे श्रमुदचे कृष्णा पाटील यांनाच पुणे विभागातील पदवीधरांची प्रथम पसंती राहणार याचा आम्हाला ठाम विश्वास आहे. शिक्षण, रोजगार, दुष्काळ, पाणी प्रश्न, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, स्त्रियांचे शोषण, जातीअंत या विषयावर ठोस भूमिका घेऊन सातत्याने लढणाऱ्या संघटनेच्या उमेदवाराला या विभागातील सुज्ञ मतदार आपले प्रथम पसंतीचे मत देऊन निश्‍चितपणे प्रतिनिधित्व करण्याची संधी देतील याचा आम्हाला विश्वास आहे, असे त्यांनी सांगितले.

बाबो! हे आता अतिच झालं की.. पुसेसावळीत चक्क गाढवांवरून वाळू तस्करी, महसूलचा कानाडोळा

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

SCROLL FOR NEXT