सातारा

सातारा : बंद ठेवलेली कोरोना केअर सेंटर पुन्हा उघडण्याच्या मार्गावर

प्रशांत घाडगे

सातारा : दिवाळीच्या काळात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने आता बाधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दिवाळीआगोदर रुग्णांची संख्या कमी झाल्याने जिल्ह्यातील 14 कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करत 12 सेंटर सुरू ठेवली आहेत. मात्र, सद्यःस्थितीत रुग्णांची संख्या पाहता पुढील काही दिवसांत आढावा घेऊन बंद कोरोना सेंटर उघडली जाणार आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने हे स्पष्ट केले.
 
मार्च महिन्यापासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सुरू झाल्याने रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत होती. ऑक्‍टोबर व नोव्हेंबर महिन्यात रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी आल्याचे आकडेवारीवरून दिसून आले. मात्र, सद्यःस्थितीत पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील नऊ महिन्यांत जिल्ह्यात सुमारे 50 हजार बाधित रुग्णांची नोंद झाली असून 1,675 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 12 हजार 180 रुग्ण हे सातारा तालुक्‍यात आढळले असून, कऱ्हाड तालुक्‍यात दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे, तर इतर तालुक्‍यांच्या तुलनेत महाबळेश्‍वर व माण तालुक्‍यांतील रुग्णसंख्या कमी आहे. सद्यःस्थितीत दररोज बाधित रुग्णांची संख्या सरासरी दोनशेहून अधिक आहे. दिवाळीच्या काळात नागरिकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने त्याचे परिणाम सध्याच्या बाधित रुग्णांच्या आकडेवारीवरून दिसून येत आहेत.

मास्टर ब्लास्टर सचिन जेव्हा मुंबईतला रस्ता विसरतो, तेव्हा रिक्षाचालक म्हणतो 'मला फॉलो करा'
 
मार्च ते ऑगस्ट महिन्यात बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांना जागा उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी जिल्हाभरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली. त्यामध्ये बाधित रुग्ण, संशयित रुग्णांसाठी विविध प्रकारचे वॉर्ड तयार करून रुग्णांना सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. दिवाळीआगोदर काही महिने कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित आल्याने प्रत्येक तालुक्‍यात साधारण एक कोरोना सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खटाव तालुक्‍यात दोन, तर अन्य तालुक्‍यांत प्रत्येकी एक केअर सेंटर सुरू ठेवण्यात आली. सद्यःस्थितीत रुग्णांची संख्या बघता पुन्हा कोरोना केअर सेंटरची दारे उघडणार असल्याची शक्‍यता आहे.

दिवाळीच्या काळात रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने 14 कोरोना केअर सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्यात आली होती; परंतु पुढील काही दिवसांत रुग्णसंख्येचा आढावा घेऊन बंद सेंटर पुन्हा उघडली जातील. 

- डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी 


तालुकानिहाय आकडेवारी (ता. 23 नोव्हेंबरअखेर) 

तालुका - बाधित संख्या - मृत
 
सातारा - 12180 - 64
 
कऱ्हाड - 10569 - 331
 
कोरेगाव - 4521 - 148
 
फलटण - 4345 - 131
 
वाई - 3799 - 134
 
खटाव - 3501 - 148
 
जावळी - 2796 - 64
 
खंडाळा - 2454 - 69
 
पाटण - 2032 - 112
 
माण - 1947 - 83
 
महाबळेश्‍वर - 1135 - 20

एकरकमी एफआरपीचे कारखान्यांना आदेश देऊ ; अजित पवारांचे स्वाभिमानीला आश्वासन 

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. रितेश-जेनेलिया देशमुखांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT