सातारा

सभासदांनाे.. सहकारी संस्थांचा लाभांश यंदा विसरा!

उमेश बांबरे

सातारा : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी सहकार विभागाने सर्व सहकारी संस्थांचे संचालक, सर्वसाधारण सभा आणि ऑडिटला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. त्यामध्ये आणखी वाढ करून संस्थांचे ऑडिट व संचालकांना डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे पतसंस्था, सहकारी बॅंकांचे ऑडिट होऊन वर्षभरात झालेला नफा डिसेंबरनंतरच समजणार आहे. परिणामी सहकारी संस्थांच्या सभासदांना किमान यावर्षी तरी लाभांश मिळणार नाही.
 
कोरोनाने सर्वच घटकांवर परिणाम केला आहे. संसर्ग टाळण्यासाठी शासन स्तरावरून विविध सूचनांचे पालन करण्याचे आदेश नागरिकांना वेळोवेळी दिले जात आहेत. अशा परिस्थिती महसूल विभागाने मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया न घेता त्यांच्यावर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे सहकार विभागानेही विविध सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपणाऱ्या संस्थांना मुदतवाढ दिली आहे.

कोरोनात अंडी, चिकन व्यवसायाला 'अच्छे दिन'

कोरोनामुळे सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व सहकारी संस्थांना ऑडिट, संचालक व निवडणुकीसाठी मुदतवाढ दिली होती. त्यामुळे यावर्षी सहकारी संस्थांचा लाभांश मिळणार का, असा प्रश्‍न निर्माण झाला होता. डिसेंबरपर्यंत सामाजिक अंतराचे पालन करून सभा घेता येऊ शकणार होत्या. पण, बहुतांश पतसंस्था या ग्रामीण भागात असून त्यांच्या सभासदांकडे ऑनलाइन सभा घेण्यासाठीची यंत्रणा उपलब्ध नाही. तसेच सहकारी साखर कारखान्यांचे सभासदही ग्रामीण भागात जास्त असल्याने त्यांचीही ऑनलाइन सभा घेणे शक्‍य नाही. परिणामी, सभा घेऊन संसर्ग वाढण्याचा धोका टाळण्यासाठी सहकार विभागाने आणखी तीन महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे बंगळूर महामार्गावरील सेवा रस्ता खचला 

त्यामध्ये सर्व सहकारी संस्थांच्या ऑडिट व संचालकांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ, तर वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासाठी मार्च 2021 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे यावर्षी वार्षिक सर्वसाधारण सभा होऊन लाभांश मिळेल, या आशेवर बसलेल्या सभासदांची मात्र कोरोनामुळे निराशा झाली आहे. आता मार्च 2021 नंतरच सभा झाल्यावर 2020 चा लाभांश सभासदांना मिळू शकणार आहे. पण, सभासद आपल्या संस्थेची वर्षभरातील नेमकी आर्थिक परिस्थिती जाणून घेऊ शकतात. त्यासाठी त्यांनी लेखी अर्ज केल्यास ऑडिटपूर्व नफा-तोटापत्रकही पाहायला मिळू शकणार आहे. 

राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो

बाजार समितीच्या संचालकांनाही मुदतवाढ
 
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदत दहा ऑगस्टला संपली होती. पण, कोरोनामुळे त्यांना सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली होती. कोरोनाचा संसर्ग कायम असल्याने निवडणुका घेता येत नाहीत. परिणामी पणन विभागाने बाजार समितींच्या संचालकांना तब्बल सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे बाजार समितीच्या विद्यमान संचालकांना मार्च 2021 पर्यंत संचालक राहण्याचा बोनस मिळाला आहे.

सलग तिस-या दिवशी खासदार श्रीनिवास पाटलांनी संसदेत साता-याचे लक्ष वेधले

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT