Satara Latest Marathi News Satara Politics News
Satara Latest Marathi News Satara Politics News 
सातारा

Gram Panchayat Results : अटीतटीच्या लढतीत बावधन ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे 'वर्चस्व'

भद्रेश भाटे

वाई (जि. सातारा) : राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बावधन ग्रामपंचायतीच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत सत्तारूढ भैरवनाथ ग्रामविकास पॅनेलने 9 जागा जिंकून सत्ता कायम राखली. भाजप व शिवसेनेच्या बावधन विकास पॅनेलने 8 जागांवर विजय मिळवित जोरदार लढत दिली.
 
या निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या 17 जागांसाठी 37 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पुरस्कृत सत्तारूढ भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व शिवसेना- भाजपच्या संयुक्त बावधन विकास आघाडीत अटीतटीची लढत झाली. त्याशिवाय तीन अपक्ष रिंगणात होते. सत्तारूढ पॅनेलचे तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, माजी सभापती दिलीप पिसाळ, वसंतराव पिसाळ, मदनआप्पा भोसले, तर बाबधन विकास आघाडीचे पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे व शिवसेनेचे विवेक भोसले, सयाजी पिसाळ, सुनील कदम, सचिन भोसले यांनी नेतृत्व केले. या वेळी अंतर्गत गटबाजीचा फायदा विरोधकांनी करून घेतल्याने सत्तारूढ गटाला चांगला फटका बसला.

विजयी उमेदवारांची नावे- (कंसात मिळालेली मते) : भैरवनाथ वॉर्ड क्र. 1- बावधन विकास आघाडी- सूरज शरद कदम (655), स्वाती संतोष ननावरे (630), सुजाता अर्जुन कुंभार (608). हनुमान वॉर्ड क्र. 2- भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल- जयश्री नागनाथ भोसले (554), बावधन विकास आघाडी- तुषार राजेंद्र पिसाळ (589), विजयकुमार दत्ताराम रासकर (656). मोरेश्वर वॉर्ड क्र. 3- बावधन विकास आघाडी- विवेक वसंत भोसले (502), चतुरा भास्कर जाधव (485). धुळेश्वर वॉर्ड क्र. 4- भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल- तानाजी बरमाराम कचरे (580), वंदना जगदीश कांबळे (586), स्मिता संतोष भोसले (504). गणेश वॉर्ड क्र. 5- भैरवनाथ ग्राम विकास पॅनेल- उदयसिंह वसंतराव पिसाळ (509), अंजली रवींद्र किर्वे (623), शुभांगी संतोष कांबळे (488). जोतिर्लिंग वॉर्ड क्र. 6- भैरवनाथ ग्राम विकास पॅनेल- प्रियांका पृथ्वीराज कचरे (608), हणमंत वसंत कांबळे (643), बावधन विकास आघाडी- संदीप सत्यवान पिसाळ (642). 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT