Temperature Increase
Temperature Increase sakal
सातारा

Heat Stroke : सातारा जिल्‍ह्यात उष्‍माघाताचा धोका वाढला; पारा ४१ अंशांवर

सकाळ वृत्तसेवा

उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. शहरात मागील आठवडाभरात उष्माघाताचे पाच रुग्ण आढळून आले आहेत.

सातारा - उष्णतेचा पारा दिवसेंदिवस वाढत चालल्याने उष्माघाताचा धोका वाढला आहे. शहरात मागील आठवडाभरात उष्माघाताचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. शहरासह जिल्हाभरात उष्णतेचा पारा ३९ ते ४१ अंश सेल्सिअसवर जात असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने एप्रिल महिन्याच्या मध्यान्हानंतर सूर्याची भीषण उष्णतेने नागरिकांना हैराण केले आहे. वाढलेल्या उष्णतेत काळजी न घेतल्यास उष्माघाताचा धोका होण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील दुपारचे तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत जात आहे. त्यामुळे वाढलेल्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत प्रमुख शहरातील रस्ते ओस पडू लागले आहेत. वाढलेला उकाडा, त्यातून निर्माण होणारे आजारामुळे नागरिकांचे लाही लाही होत आहे. वाढलेल्या तापमानाचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी नागरिकांना त्याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे.

एप्रिल महिन्यात वाढलेल्या तापमानामुळे मागील काही दिवसांत जिल्हाभरात पाच रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासनही सतर्क झाले असून, उपाययोजना राबविण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा रुग्णालयासह मोठ्या आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष स्थापन करण्याची सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, वाढलेल्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले.

उष्माघात झाल्यास काय करावे...

उष्माघात झाल्यास शरीरातील जास्त झालेली उष्णता लवकरात लवकर बाहेर काढणे व रक्ताभिसरण खेळते ठेवणे हाच प्रथमोपचार आहे. सर्वप्रथम व्यक्तीला शक्य असल्यास वातानुकूलित जागेत अन्यथा सावलीत वा थंड ठिकाणी हलवावे. शरीरावरील जास्तीचे कपडे काढून टाकावेत. त्यामुळे शरीरातील उष्ण तापमान कमी होण्यास मदत होते. त्यानंतर त्रास कमी न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

उष्माघाताची लक्षणे

तहान लागणे, डोके दुखणे, थकवा येणे, अस्वस्थ वाटणे, रक्तदाब कमी होणे, जीभ कोरडी पडणे, चक्कर येऊन बेशुद्ध पडणे, हृदयाची धडधड होणे, नाकातून रक्त येणे

उपाययोजना

दुपारच्या वेळेत बाहेर पडणे टाळावे, पाण्याची बाटली सोबत ठेवा, लिंबू पाणी प्या, सुती कपडे वापरा, छत्रीचा वापर करा, बाहेर फिरताना रुमालाने चेहरा झाकून गॉगलचा वापर करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhanparishad Election : शिवसेना ठाकरे गटाकडून परब, अभ्यंकर

NASA : भारतीय अंतराळवीरांना आता ‘नासा’चे धडे; गार्सेटी यांची घोषणा

Loksabha Election 2024 : लोकांनी द्वेषाला धुडकावले; राहुल गांधी यांचे प्रतिपादन

Loksabha Election 2024 : ‘साखरेचा वाडगा’ काँग्रेससाठी कडू! देवरियात ओबीसी मतांवर भाजपची भिस्त

Narendra Modi : मतपेढीसाठी ‘इंडिया’चा मुजरा; मोदींची विरोधकांवर टीका

SCROLL FOR NEXT