सातारा

पुळकोटी आरोग्य केंद्रास देसाई उद्योग समूहाचा मदतीचा हात

रुपेश कदम

दहिवडी (जि. सातारा) : सध्या भयावह परिस्थिती असून, ऑक्‍सिजनअभावी अनेकांना आपल्या प्राणास मुकावे लागत आहे. पण, कुकुडवाड गटातील कोणावरही अशी वेळ येऊ नये, म्हणून देसाई उद्योग समूहाकडून आरोग्य विभागाकडे पाच ऑक्‍सिजन सिलिंडर सर्व मशिनसह मदत म्हणून देत आहोत, असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बॅंकेचे संचालक अनिल देसाई यांनी केले. 

पुळकोटी (ता.माण) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास देसाई उद्योग समूहाकडून पाच ऑक्‍सिजन सिलिंडर सर्व मशिनसह मदत म्हणून देण्यात आले. त्याप्रसंगी श्री. देसाई बोलत होते. या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, वरकुटे मलवडीचे सरपंच बाळकृष्ण जगताप, जालिंदर खरात, तानाजी काळेल, जांभुळणीचे सरपंच भोजलिंग काळेल, शहाजी काळेल, गणेश माने, समीर ओंबासे, डॉ. योगेश कुलकर्णी, अजित काळेल आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले,"" कोणीही आजार लपवू नका, योग्य उपचाराने हा आजार बरा होतो. ग्रामीण भागातील जनतेचे योग्य उपचार व सोयी-सुविधांअभावी हकनाक बळी जाऊ नयेत, म्हणून देसाई उद्योग समूहाकडून ऑक्‍सिजन सिलिंडरची मदत करण्यात आली आहे.''

डॉ. कोडलकर म्हणाले, "सध्या सर्वत्र ऑक्‍सिजन सिलिंडरचा तुटवडा आहे. त्यामुळे उपचार करताना आम्हाला मर्यादा येत आहेत. पण, देसाई कुटुंबीयांनी दिलेल्या मदतीमुळे रुग्णांवर उपचार करणे शक्‍य होणार आहे. या सिलिंडरच्या माध्यमातून एकावेळी किमान दहा रुग्णांवर या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करता येणार आहेत.'' या वेळी ग्रामस्थ, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT