sakal
sakal
सातारा

कऱ्हाड: मलकापूरमध्ये चोरट्यांनी सहा दुकाने फोडली

(शब्दांकन - सचिन शिंदे)

कऱ्हाड : एकाच रात्रीत सहा दुकाने फोडून चोरट्यांनी रात्री धुमाकूळ घातला. मलापुरातील ढेबेवाडी फाट्यावरील महामार्ग पोलिस मदत केंद्रामागील कॉम्‍प्‍लेक्‍समध्ये चोरी झाल्याने त्याची दिवसभर चर्चा होती. चोरीत ५० हजारांची रोख रक्कम व काही महत्त्‍वाचे साहित्य असा जवळपास लाखांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे. रात्री झालेल्या चोरीचा पोलिसांना मागमूसही लागला नाही. एकाच रात्रीत सहा ते सात ठिकाणी झालेल्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

पोलिस व घटनास्थळावरील माहिती अशी, तेथील ऑनलाइन लॉटरीसहित फिश मार्केटचे दुकान आणि किराणा मालाचे दुकान चोरट्यांनी फोडले आहे. मलकापुरातील ढेबेवाडी फाटा येथील महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. त्या मदत केंद्रामागील व त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कमर्शियल अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी काल रात्री धुमाकूळ घातला. चोरट्यांनी सहा ते सात दुकानांवर डल्ला मारला. त्यातील तीन दुकानांतील तब्बल ५० हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. दोन दुकाने फोडण्याचा प्रयत्न झाला.

मात्र, त्याचे शटर्स उचकटताना आवाज झाल्याने चोरटे तेथून लंपास झाले. दोन ऑनलाइन लॉटरीच्या दुकानांतून तब्बल ३० हजारांची रोख रक्कम तर एका फिश मार्केटच्या दुकानातील ३० हजारांची रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. त्याची माहिती त्वरित पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोचून वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले आहेत. वेळ पडल्यास श्वानपथकासही बोलविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT