dalit mahasangh leader machindra sakate with atul bhosale
dalit mahasangh leader machindra sakate with atul bhosale sakal
सातारा

Karad News : फडणवीस-सकटे यांची लवकरच भेट घडवू; दलित महासंघाच्या शिष्टमंडळाने भोसलेंची घेतली भेट

सकाळ वृत्तसेवा

- सचिन शिंदे

कऱ्हाड - मातंग समाजाला लोकसभेची एकही उमेदवारी दिली नसल्यामुळे भारतीय जनता पक्षावर नाराज असलेल्या दलित महासंघाचे नेते प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लवकरच बैठक आयोजित करणार आहोत, असे अश्वासन भाजपचे सातारा लोकसभा प्रभारी अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेवेळी दिले.

भाजपचे नेते श्री. भोसले यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करण्याची घोषणा दलित महासंघाने केली होती. मात्र पोलीसांनी आचारसंहितेचे कारण सांगून दलित महासंघाच्या कार्यकर्त्यांना निदर्शने करण्यास विरोध केला. पोलीसांनी महासंघाच्या शिष्ट मंडळास भेटण्याची परवानगी दिली. श्री. भोसले व प्रा. सकटे यांचीही बैठक घडवून आणली.

यावेळी शिष्टमंडळा मध्ये माजी आमदार आनंदराव पाटील, दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, आनंदराव मोहिते, बहुजन समता पार्टीचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ दाभाडे, तालुकाध्यक्ष जयवंत सकटे, बाबासाहेब दबडे, बळीराम रणदिवे, अरुणा कांबळे, भरत साठे उपस्थित होते.

प्रा. सकटे म्हणाले, महाराष्ट्रातील मातंग समाजाची सामाजिक व राजकीय स्थिती बिकट आहे. त्यांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या संदर्भात केलेल्या कामही महत्वाचे आहे. मात्र लोकसभेच्या एकूण ४८ पैकी पाच जागा अनुसूचित जातीसाठी राखीव असताना, त्यातील एकही जागा मातंग समाजाला दिली गेली नाही, हबी आमची खंत व्यक्त केली.

या सर्व प्रश्नावर भाजपचे नेते अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळास आश्वासन दिले की, "राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मच्छिंद्र सकटे यांची लवकरच भेट घालून देणार आणि मातंग समाजाच्या भावनांची जपणूक करणार" अशा प्रकारच्या आश्वासन अतुल भोसले यांनी दलित महासंघाच्या शिष्टमंडळास दिले.

बैठकीमध्ये श्री. भोसले यांनी दलित प्रा. सकटे यांचा शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सत्कार व स्वागत केले. राजकीय हक्कापासून वंचित असलेल्या मातंग समाजाला त्यांचा योग्य तो वाटा देऊन, त्यांना सन्मानाने सोबत घ्यावे अशी मागणी प्रा. सकटे यांनी केली. पोलीसांनी दलित महासंघाच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. दलित महासंघाच्या कार्यकर्त्याला नोटीस दिल्या होत्या. त्याचबरोबर कृष्णा रूग्णालय येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

चव्हाणांच्या घरी रविवारी भाजपचे अतुल भोसले यांची भेट घेतल्यानंतर प्रा. सकटे उद्या (शनिवारी) माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट घेणार होते. मात्र श्री. चव्हाण परगावी आहेत. त्यामुळे रविवारी त्यांची घरी भेट घेणार आहोत, असे प्रा. सकटे यांनी स्पष्ट केले. पोलिसांच्या विनंतीसह आचारसहींतेमुळे आंदोलन रद्द करून भेट घेवून दलीत समाजाच्या भावना शिष्टमंडळासमोर मांडण्याचे काम आण्ही करत आहोत, असेही प्रा. सकटे यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT