light bill
light bill light bill
सातारा

कऱ्हाड पालिकेला वीज बिलाचा ‘शॉक’

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : मागील सप्टेंबरमध्ये वीज कंपनीने पालिकेच्या मुख्य कार्यालयाचे वीज बिल थकल्याने पालिकेचे वीज कनेक्शन तोडले होते. त्यानंतर ती थकीत रक्कम भरल्याने ते कनेक्शन पूर्ववत झाले. मात्र, त्यानंतर अवघ्या आठ महिन्यांत पुन्हा एकदा पालिकेचे वीज बिल थकीतमध्ये गेले आहे. एक दोन नव्हे तर तब्बल ३४ लाखांचे वीज थकल्याने वीज कंपनीने पालिकेला नोटीस दिली आहे. त्यानुसार येत्या सात दिवसांत ती थकीत रक्कम न भरल्यास पालिकेला पुन्हा एकदा वीज कनेक्शन कट करण्याच्या नामुष्कीलाही सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

पालिकेच्या जनरल फंडात खडखडाट असल्याने पालिकेचे वीज बिल थकल्याचे सांगितले जात असले तरी पालिकेचे आर्थिक नियोजन अवघ्या आठ महिन्यांत पुन्हा एकदा फसल्याचेच दिसते. पालिकेचे पाणीपुरवठ्यासहित उच्च दाबाच्या साऱ्या जोडण्या, पंपिंग स्टेशन, टाउन हॉल अशा मोट्या वास्तूंची वीज बिले थकीतात गेली आहेत. त्यामुळे तब्बल ३४ लाखांची वीज बिले भरायची बाकी आहेत. कोविडपासून किंबहुना त्यापूर्वीही जनरल फंडातून झालेल्या कामामुळे बिले अदा केली गेल्याने पालिकेचे आर्थिक नियोजन फसले होते. ते अद्यापही तीन वर्षे आजअखेर सुरळीत झालेले नाही. आजही पालिकेच्या फंडात आर्थिक टंचाई असल्याने पालिकेला वीज बिल भरणेही मुश्कील झाल्याचे दिसते.

त्याचे नियोजन करताना प्रशासक तथा मुख्याधिकारी रमाकांत डाके यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यापूर्वी वीज कंपनीने पालिकेच्या मुख्य कार्यालयासहित पंपिंग स्टेशनचीही वीज बिले थकीत गेल्याने तेथील कनेक्शन कापले होते. यावेळी आता तीच स्थिती आहे. पालिकेची मुख्य इमारत वगळता अन्य इमारतींच्या वीज बिलांचा प्रश्न अत्यंत जटिल बनला आहे. त्याची थकीत रक्कम जवळपास ३४ लाखांच्या घरात गेली आहे. महिनाभरापासून वीज कंपनीने पालिकेकडे वसुलीचा तगादा लावला आहे. मात्र, ती बिले भरण्यास पालिका असमर्थ ठरली आहे. पर्यायाने वीज कंपनीने पालिकेला अंतिम नोटीस जारी करून केवळ काही दिवसांचीच मुदत दिली आहे. त्या कालावधीत पालिकेने पैसे न भरल्यास पुन्हा एकदा वीज कनेक्शन कट होण्याची नामुष्की पालिकेवर येणार आहे. स्टेडियम, स्ट्रीट लाइट, जलशुद्धीकरण केंद्र, पंपिंग स्टेशन, अन्य यंत्रणेचाही त्या थकीत बिलात समावेश असल्याची माहिती आहे. तीही बिले पालिकेने न भरल्यास वीज तोडण्याची प्रक्रिया राबवली जाणार आहे, असे वीज कंपनीतून सांगण्यात आले.

पालिकेच्या पंपिंग स्टेशनची उच्च दाबाच्या जोडण्याची वीज बिले थकीत आहेत. त्याचा आकडा जवळपास ३४ लाखांच्या घरात आहे. त्याच्या वसुलीसाठी महिन्यापासूनचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही वीज कंपनीने कनेक्शनची अंतिम नोटीस दिली आहे. आठवड्याभरात वीज बिल भरण्याची गरज आहे.

-बाबासाहेब पवार,सहायक अभियंता, वीज कंपनी, कऱ्हाड

पालिकेची कर वसुली सुरू आहे. त्यातून येणाऱ्या निधीतून वीज बिल भरले जाणार आहे. काही प्रमाणात वीज बिल भरले आहे. मागील थकबाकी शिल्लक आहे. त्याचे नियोजन सुरू आहे. आठवडाभरात तेही भरण्याची तरतूद करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

-रमाकांत डाके,मुख्याधिकारी तथा प्रशासक, कऱ्हाड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT