Atul bhosale
Atul bhosale sakal
सातारा

Karad News : ‘कृष्णा’ कारखान्याच्या साथीने वाकुर्डे योजनेचे पाणी खळाळणार

हेमंत पवार

कऱ्हाड - दुष्काळाच्या तीव्र झळांनी उंडाळे व काले विभागातील पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्या भागातील शेतकऱ्यांना वाकुर्डे योजनेतून पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी दरवर्षी रेठरे बुद्रुकच्या य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना पुढाकार घेतो.

यंदाही कारखान्यामार्फत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांनी थकीत वीज बिलापोटी तीन लाखांचा धनादेश शेतकऱ्यांच्या माध्यमातून योजनेच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. कारखान्याने सन २०१६ ते २०२४ दरम्यान आत्तापर्यंत २१ लाख ८० हजार ५५४ रुपये अदा केले आहेत.

वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून उंडाळे व काले विभागातील काले, ओंड, ओंडोशी, नांदगाव, मनव, उंडाळे, शेवाळवाडी, जिंती, टाळगाव, घोगाव, येणपे, वाठार, झुजारवाडी, पवारवाडी, चोरमारवाडी, माटेकरवाडी, येळगाव, गोटेवाडी, म्हारूगडेवाडी, आकाईवाडी, साळशिरंबे या गावातील ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो.

गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईच्या झळांनी या भागातील शेतकरी त्रस्त बनला आहे. त्यामुळे या भागासाठी वरदान ठरलेल्या वाकुर्डे योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी त्वरीत पाणी सोडले जावे, यासाठी या भागातील शेतकऱ्यांचा पाठपुरावा सुरू होता. पण योजनेच्या थकीत वीजबिलामुळे पाणी उपलब्ध होण्यास अडचण निर्माण झाली होती.

२०१८ मध्ये शेतकऱ्यांनी हा प्रश्न भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अतुल भोसले यांच्याकडे मांडला. त्यांनी कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून हे थकीत वीज बिल अदा करण्याबाबत पुढाकार घेतला. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी त्यासाठी सहकार्य केले. अतुल भोसले यांच्या पाठपुराने शासनाने वाकुर्डे योजनेचा समावेश विशेष योजनेत करुन ८१ टक्के वीजबिल शासन तर १९ टक्के बिल लाभधारक शेतकऱ्यांना भरण्याबाबतची तरतूद केली.

कृष्णा कारखान्याने यंदाही तीन लाख रुपये दिले आहेत. कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक दयानंद पाटील, नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, पंकज पाटील, जयवंत यादव, अण्णासाहेब जाधव, निवास शेवाळे, व्ही. टी. थोरात, दादासो शेवाळे, जयवंतराव शेवाळे, संताजी शेवाळे, संतोष पाटील, अशोक पाटील, संपतराव पाटील, योगेश पाटील, प्रवीण साळुंखे, विनोद पाटील, पोपट साळुंखे, धनाजी पाटील, आबासो शेंडगे, राहुल पाटील, प्रमोद पाटील, विक्रम पाटील, मच्छिंद्रनाथ म्हारुगडे, पैलवान अविनाश थोरात, पैलवान प्रवीण थोरात, दादासो अम्राणी, वैभव जाधव, मयुर जाधव, राजेंद्र थोरात आदी उपस्थित होते.

योजना सौर उर्जेवर करण्याचा प्रयत्न

वाकुर्डे योजनेचे पाणी वेळेत आणि नियमितपणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी, ही योजना भविष्यात सौर उर्जेवर कार्यान्वित करण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे असे सांगुण अतुल भोसले भोसले म्हणाले, शासन दरबारी या मागणीला यश आल्यास शेतकऱ्यांना सहन करावा लागणारा वीजबिलाचा भुर्डंद कमी होण्यास मदत होईल.

या भागातील शेतकऱ्यांच्या पाण्या संदर्भातील समस्या सोडविण्यासाठी टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, वारणा सिंचन विभाग, मृदा व जलसंधारण विभागातील अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक येत्या काळात घेण्यात येईल.

दुसरे आवर्तन मे महिन्यात

वाढता उन्हाळा लक्षात घेता, पाण्याची गंभीर समस्या उद्‌भवणार असल्याची भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यावर अतुल भोसले यांनी तत्काळ वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे यांना फोनवरुन संपर्क साधून शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत सूचना केली. यावेळी श्री. शिंदे यांनी पुढील महिन्यात पाण्याचे दुसरे आवर्तन सोडले जाणार असून, २२०० हेक्टर जमिनीसाठी मंजूर झालेले पाणी पूर्ण क्षमतेने देण्याची ग्वाही दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT