सातारा

Mahashivratri 2021 : श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टने जाहीर केला महत्वपुर्ण निर्णय

अभिजीत खूरासणे

महाबळेश्वर (जि. सातारा) : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दहा ते 12 मार्चदरम्यान तीन दिवस श्री महाबळेश्वर (Mahableshwar) मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तहसीलदार सुषमा चौधरी-पाटील यांनी दिली. दरम्यान, क्षेत्र महाबळेश्वर येथील इतर सर्व मंदिरे ही तीन दिवसांसाठी बंद करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
 
महाशिवरात्रीला (Mahashivratri) दरवर्षी क्षेत्र महाबळेश्वर येथे वार्षिक यात्रा भरते. या दिवशी श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने तसेच ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. श्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. कोविडचा धोका लक्षात घेऊन देवस्थान ट्रस्टने बैठक घेत यंदा महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. महाशिवरात्र ही 11 मार्चला आहे. परंतु, 10 मार्चपासूनच हे मंदिर पुढील तीन दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात सर्व नित्यनियमाने होणारे धार्मिक विधी पार पडतील. महाशिवरात्रीला या मंदिरात विश्वस्तांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधी पार पडतील. सकाळी व सायंकाळी श्री महाबळेश्वराच्या आरतीला भाविकांना ऑनलाइन उपस्थित राहता येईल.

महाबळेश्वरनंतर थंड हवेचे ठिकाण माहितीय?; प्रसिध्द अभिनेता आमिर खाननेही केली या गावात पिक्चरची शुटिंग
 
क्षेत्र महाबळेश्वर येथे पाच नद्यांचे उगमस्थान आहे. या स्थानावर पंचगंगा मंदिर बांधण्यात आले आहे. या मंदिरात पाच नद्यांचे पाणी नंदीच्या मुखातून एका दगडी कुंडात पडते. श्री महाबळेश्वराच्या दर्शनाला जाण्यापूर्वी या कुंडात स्नान करून भाविक श्री महाबळेश्वरच्या दर्शनासाठी जातात. त्यामुळे या मंदिरातही भाविकांची गर्दी होते. याशिवाय महाबळ व अतिबळ यांचीही मंदिरे आहेत. श्री कृष्णामाईचेदेखील पौराणिक मंदिर येथे आहे. ही सर्व मंदिरे भाविकांसाठी बंद राहणार आहेत.

अंतर्गत कुरबुरीमुळे महाविकास आघाडीचे सरकार पडणार

धमकावून वडापाव नेणा-या गजा मारणेला रात्रीत पोलिसांनी हलविले

FasTag स्कॅन हाेत नाहीये, थांबा! टाेलचे पैसे देऊ नका; हे वाचा

यमदूताने गाठण्यापूर्वी तुम्हाला मिळेल मदत 

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP चं आंदोलन थेट लंडनमध्ये! ध्रुव राठी मैदानात, ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काय आहे प्लॅन?

Gold Investment: सणासुदीपूर्वी गोल्ड ईटीएफला स्थगिती; नव्या गुंतवणुकीवर निर्बंध, गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी

Crispy Sweet Potato Fries Chaat: गोड दही, चटपटीत चटणी अन् कुरकुरीत फ्राइज; असा बनवा उपवासासाठी खास रताळ्याचा चाट!

चार वर्षांनी त्याच मैदानावर परतणार भुवनेश्वर कुमार! जिथे टी-२० पदार्पणात घेतल्या होत्या ३ विकेट्स, तिथेच आता मालिकेचा निर्णायक सामना

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १७ ऑक्टोबर २०२६ ते २३ ऑक्टोबर २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT