Satara
Satara  sakal
सातारा

Satara : ज्‍येष्‍ठ नागरिकांनी प्रशासनाचे मार्गदर्शक व्‍हावे

सकाळ वृत्तसेवा

मलकापूर : ज्येष्ठ नागरिकांच्या सूचनेप्रमाणे शहरांमध्ये विकासकामे व सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या अनुभवांचे मार्गदर्शन प्रशासनास व जनतेला करावे. त्यांचा सन्मान करणे म्हणजे भाग्यच आहे, असे प्रतिपादन उपाध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले.

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत येथील पालिका, प्राथमिक आरोग्य केंद्र काले व सुमन मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक सत्कार समारंभ, मोफत आरोग्य तपासणी व कोविड- १९ बूस्टर डोस लसीकरणाचे आयोजन केले होते.

त्या वेळी श्री. शिंदे बोलत होते. नगराध्यक्षा नीलम येडगे, इंद्रजित चव्हाण, धनाजी काटकर, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, माजी जिल्हा परिषद सदस्या विद्या थोरवडे, नगरसेवक आबा सोळवंडे, सागर जाधव, राजू मुल्ला, शहाजी पाटील, सुहास कदम, गणेश चव्हाण, दादा तुपे, काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कागदी, सुरेखा पावणे, राजू पटेल ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

श्री. यादव म्हणाले, ‘‘आपल्यालाही या वयातून जायचे आहे. ही बाब लक्षात घेऊन कुटुंबीयांनी व नागरिकांनी ज्येष्ठांबरोबर आदराने व नम्रपणे राहावे. आयुष्यभर त्यांनी अनेक हालअपेष्टा सहन केलेल्या असतात. वार्धाक्यात त्यांना सन्मानाची गरज असते. दोन शब्द प्रेमाने बोलण्याची त्यांची अपेक्षा असते ती आपण पूर्ण करूया.’’

श्री. माने, श्री. जाधव यांची भाषणे झाली. राजेंद्र यादव यांनी प्रास्ताविक केले. सागर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. हणमंत शिंगण यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RBI Income: रिझर्व्ह बँकेने केली 2 लाख कोटींहून अधिक कमाई; RBI पैसे कसे कमावते?

Sanjay Raut: डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा अधिकार

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

SCROLL FOR NEXT