Nagpur police raids in Karad satara
Nagpur police raids in Karad satara 
सातारा

नागपूर पोलिसांचे कऱ्हाडमध्ये छापे

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड - नागपुरात एकाची ऑनलाइन झालेल्या फसवणूक प्रकरणात नागपूर पोलिसांनी आज शहरात छापे टाकले. कऱ्हाड पोलिसांच्या मदतीने झालेल्या कारवाईत एकाला चौकशीला ताब्यात घेतले आहे. कैफ इब्राहिम सय्यद (रा. सोमवार पेठ, कऱ्हाड) असे त्याचे नाव आहे. त्याच्या खात्यावरून लाखो रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन पोलिस नागपूरला रवाना झाले आहेत.

ऑनलाइन फसवणूक प्रकरणात कैफचा अन्य राज्यातील भामट्यांशी संबंध असल्याने त्याच्या खात्याचा वापर केल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यानुसार कारवाई झाली आहे. ऑनलाइन फसवणुकीतील गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नागपूर पोलिस काल रात्रीपासून येथे ठाण मांडून होते. आज सकाळी कऱ्हाड पोलिसांच्या मदतीने नागपूर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरासह कार्यालयावर छापे टाकले. त्याला ऑनलाइन फसवणुकीच्या गुन्हा ताब्यात घेतले आहे.

नागपूर पोलिसांत दाखल गुन्ह्यातील फसवणुकीचे धागेदोरे कैफपर्यंत पोचल्याने त्या अनुषंगाने छापे टाकल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्याच्या खात्यावर लाखो रुपयांची उलाढाल असल्याचे तपासात समोर आले आहे. त्याने या अगोदर ऑनलाइन फसवणूक केल्याचीही माहिती पोलिसांना दिली. ऑनलाइन फसवणुकीचे नेटवर्क परराज्यापर्यंत आहे. त्यामुळे कैफचा तपास महत्त्वाचा असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT