सातारा

गुड न्यूज : कऱ्हाडला नवीन साठ बेडची उपलब्धता; रुग्णांना सुविधा देणार : तहसीलदार अमरदीप वाकडे

हेमंत पवार

कऱ्हाड : येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा काही भाग कोविड सेंटर करण्यात येणार आहे. त्यासाठी तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी नियोजित कोविड कक्षाची पाहणी करून डॉक्‍टरांना सूचना दिल्या. तेथे 50 ऐवजी 60 हून अधिक नवीन बेड, आयसीयू, ऑक्‍सिजनसाठी तातडीने पावले उचलण्यासही यावेळी सुचवले.
 
कऱ्हाडला कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यांच्या उपचारासाठी अत्याधुनिक सुविधा आणि सर्वाधिक बेड कऱ्हाडला असतानाही अनेकांना उपचारासाठी तातडीने अनेकदा बेड मिळत नाहीत. त्यामुळे काहींचा जीव जाण्याच्याही घटना घडत आहेत. त्याचा विचार करून शासनाने आता येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचा काही भाग कोविड सेंटर करण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू केली आहे.

पुरस्कारासाठी राजकीय पाठबळ हवे की, आणखी काय? मराठमोळ्या प्रियांकाचे मंत्र्यांना ट्‌विट  

त्यासाठी मध्यंतरी खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली कऱ्हाडला कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील कोरोनासंदर्भातील आढावा बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी उपजिल्हा रुग्णालयाचा काही भाग कोविड सेंटर करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी मध्यंतरी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन सूचना केल्या होत्या.

वाढीव वीजबिलांवर आज होणार निर्णय ? सर्वसामान्यांना आज बाप्पा पावणार ?

त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार वाकडे यांनी तेथे भेट दिली. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. मुल्ला, डॉ. कुऱ्हाडे यांनी कोविड सेंटरच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. त्यावेळी त्यांनी आयसीयू कक्ष, ऑक्‍सिजनचे बेड आणि साधे बेड असे 50 बेड उपलब्ध होतील, असे सांगितले. त्यावर तहसीलदार वाकडे यांनी जागेच्या उपलब्धतेनुसार आणखी 10 बेड वाढवण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार पुढील कार्यवाही करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

दिवशी बुद्रुकला कुऱ्हाडीने घाव घालून पतीकडून पत्नीचा खून

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT