शिवेंद्रसिंहराजे भोसले
शिवेंद्रसिंहराजे भोसले sakal
सातारा

Satara News : राजकारणात कोणाची उंची किती?

सकाळ वृत्तसेवा

कास - उंची हे शारीरिक मोजमाप करण्याचे साधन. कोणाची उंची किती असावी, तो स्वतः ठरवू शकत नाही. तो ज्याच्या त्याच्या अनुवंशिकतेनुसार मिळणारी गोष्ट; पण हल्ली जावळीच्या राजकारणात मात्र, कोणाची उंची किती यावरून मात्र, प्रत्येक सभेत टीका टिप्पणी होताना दिसत असल्याने राजकीय हलकल्लोळ पाहावयास मिळत आहे.

या उंचीच्या वादाची सुरुवात केली वसंतराव मानकुमरे यांनी. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेआमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमात त्यांनी जावळी तालुक्यातील अमित कदम यांची उंची काढून हा उंचीवाद सुरू केला. सहा फुटी आमदार भोसलेंसमोर चार फुटी अमित कदम लढणार आणि भोसले त्यांना पाडणार? असा त्यांचा रोक होता;

पण टाळ्या मिळवणाऱ्या वाक्याने राजकारणाच्या केंद्रबिंदूपासून लांब असलेले अमित कदम एकदम फोकसमध्ये आले. त्यांचे आमदारकीचे ब्रॅंडिंग आपोआपच झाले. त्यानंतर अमित कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा कार्यक्रम विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत घेऊन जावळीत राष्ट्रवादीची हवा अजूनही आहे, हे दाखवून दिले.

या कार्यक्रमातही उंचीच्या गोष्टी न निघाल्या तर नवलच. खुद्द अजित पवार यांनी कोणाची उंची किती? हे काय आपल्या हातात नसतं, असं सांगून लालबहादूर शास्त्री, आर. आर. पाटील यांची उदाहरणे देऊन उंची वाचून काय अडत नाही. कर्तृत्व अंगात पाहिजे, हे सांगून उंची काढणाऱ्यांचे व उंची काढल्याने नाराज असणाऱ्यांचे कान टोचले.

हा उंचीचा विषय थांबला असे वाटत असतानाच दोन दिवसांपूर्वी निझरे येथील कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी उंचीवरून दीपक पवारांना फटकारले. मेढा येथील कार्यक्रमातील अजित पवार यांच्या विधानाचा संदर्भ घेत तुमचे सरकार असताना तुम्ही निधी आणू शकला नाही म्हणजे, तुमची उंची कमी पडली का? असा सवाल केला. या ठिकाणी शारीरिक उंची अपेक्षित नसली, तरी कर्तृत्वाची उंची त्यांनी काढलीच.

यामुळे जावळीत सध्या उंचीची चर्चा जोरदारपणे सुरू आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार वाढतच जाणार आहे; पण या साऱ्या गदारोळात ही उंची ठरवणारी जनता मात्र, हा सारा खेळ शांतपणे पाहात आहे.

आगामी काळात जावळीच्या राजकारणात शारीरिक उंची महत्त्वाची ठरणार, की कर्तृत्वाची उंची? हे निवडणुकीतील कामगिरीवरच कळणार आहे. त्यामुळे नेते मंडळीनो एकमेकांची उंची काढण्यात वेळ न घालवता जनतेच्या हिताची कामे करून आपली कर्तृत्वाची उंची वाढवावी, हीच सामान्याची अपेक्षा आहे.

वैभव मिळवून द्या...

एकमेकांची उणीदुणी न काढता वैचारिक व कर्तव्याची उंची वाढवा, तुम्ही केलेल्या कामातूनच तुमची उंची ठरणार असल्याने कामे करून दुर्गम व मागास अशी आजही ओळख असलेल्या, रोजगारासाठी मुंबईवर अवलंबून असलेल्या जावळीला वैभव मिळवून द्या, अशी अपेक्षा जावळीतील जनतेतून व्यक्त होताना दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT