Koyna Dam
Koyna Dam esakal
सातारा

अतिरिक्त वीजनिर्मिती कोयना धरणातून सुरू

सकाळ वृत्तसेवा

कोयनानगर : वीजटंचाईच्या काळात कोयना जलविद्युत प्रकल्पातून रेकॉर्डब्रेक वीजनिर्मिती करण्यात आली आहे. लवादाने पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी निर्धारित केलेला पाणीसाठा आज संपला आहे. राज्यातील जनतेला भारनियमनाचे चटके सोसावे लागू नयेत, यासाठी कोयना धरणातून १० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा वीजनिर्मितीसाठी देण्यात आला आहे. केवळ २० दिवसांत अतिरिक्त पाणीसाठा संपणार असल्याने धरणातील अजून ५ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी महानिर्मिती कंपनीने राज्य शासनाला केली आहे.

पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी लवादाने निर्धारित केलेला पाणीसाठा मागणी तसा पुरवठा केल्यामुळे ६७.५० टीएमसी पाणीसाठा आज संपला आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे तथा महानिर्मिती कंपनीचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांच्याशी संपर्क साधला असता ६७.५० टीएमसी हा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी लवादाने निर्धारित केलेला पाणीसाठा आज संपला आहे. या पाणीसाठ्याच्या माध्यमातून ३१६५.५०४ दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली आहे. दररोज २५.१२२ दशलक्ष युनिटसाठी ०.५६ टीएमसी पाण्याचा वापर होत आहे.

पश्चिमेकडे वीज प्रकल्पासाठी देण्यात येणाऱ्या पाण्याचा कोटा संपला असला तरी शासनाने १० टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी वाढवून दिला आहे. दहा टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा दिला असला तरी दररोज पूर्णक्षमतेने वीजप्रकल्प कार्यान्‍वित करून त्यासाठी पाणीवापर होत असल्याने हा १० टीएमसी पाणीसाठा २० दिवसांत संपणार आहे. यामुळे १५ नंतर पुन्हा पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर बंधने येऊ शकत असल्याने हा पाणीसाठा नियोजनपूर्वक वापरून फक्त उच्च मागणीच्या वेळेपुरतीच जास्त क्षमतेने वीजनिर्मिती केली तरच काही प्रमाणात पुरवता येणार आहे. यामुळे कोयना धरणातून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी अजून जादा ५ टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा देण्यात यावा, अशी मागणी केली असल्याचे मुख्य अभियंता संजय चोपडे यांनी स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT