Pratapgad Sugar Factory Election
Pratapgad Sugar Factory Election esakal
सातारा

निवडणूक लागणार का बिनविरोध होणार?

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ : जावळी तालुक्याचे सहकार मंदिर व तालुक्याची अस्मिता म्हणून आोळख असणाऱ्या सोनगाव (ता. जावळी) येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत उद्या (ता. २८) संपत असल्याने निवडणूक लागणार का बिनविरोध होणार, याचा फैसला राजकीय घडामोडींवर स्पष्ट होणार आहे.

प्रतापगड साखर कारखाना निवडणुकीसाठी ता. चार फेब्रुवारी रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर प्रतापगड कारखाना गट, प्रतापगड बचाव पॅनेल व अन्य अपक्षांकडून २१ जागांसाठी ८३ एवढे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने तालुक्यातील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला होता. अर्ज छाननीमध्ये ८३ पैकी १३ अर्ज अवैध ठरल्याने एकूण ७० अर्ज शिल्लक राहिले होते. त्यापैकी मेढा गटातून सुरेश पार्टे यांनी एकमेव उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने आजअखेर ६९ अर्ज शिल्लक राहिले आहेत.

कारखान्याची निवडणूक कोणत्याही परिस्थितीत बिनविरोध व्हावी, यासाठी तालुक्यातील अनेक राजकीय पक्षांनी व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला असून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचीदेखील तालुक्यातील नेत्यांना कारखान्याची निवडणूक बिनविरोध करा, असा सल्ला चर्चेदरम्यान दिला आहे. अर्ज माघारी घेण्यासाठी उद्या अंतिम मुदत असल्याने किती अर्ज माघारी घेतले जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून निवडणूक बिनविरोध होणार का, रंगतदार होणार, हे उद्याच स्पष्ट होणार आहे.

सभासदांसह जनतेत कमालीची उत्सुकता

गेल्या १५ दिवसांत अनेक राजकीय घडामोडी घडल्याने कारखान्याची निवडणूक बिनविरोध होईल, अशीच शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात असून सैारभ शिंदे गटाच्या संस्थापक पॅनेलच्या पाच जागा निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. मात्र, दीपक पवार यांच्या बचाव पॅनेलने कोणत्याही परिस्थीतीत निवडणूक लढणारच, असा पवित्रा घेतला असल्याने या निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता सभासदांसह तालुक्यातील जनतेला लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT