सातारा

अनलॉकनंतर सॅनिटायझर, हॅंडवॉश गायब!

केराप्पा काळेल

कुकुडवाड (जि. सातारा) : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउनचे अनलॉक करताना प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी म्हणजे दुकाने, एटीएम सेंटर, शासकीय, निमशासकीय कार्यालये आदी ठिकाणी सॅनिटायझर किंवा हॅंडवॉश ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. सुरवातीच्या काळात याची चांगलीच अंमलबजावणी झाली. मात्र, हळूहळू सार्वजनिक ठिकाणचे सॅनिटायझर गायब होण्यास सुरुवात झाली आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या आदेशाला नागरिकांनी सर्रास केराची टोपली दाखवलेली आहे. सुरुवातीला दुकाने, एटीएम, स्वस्त धान्य दुकाने, पेट्रोल पंप, कृषी दुकाने, फळविक्रेते, शासकीय, निमशासकीय कार्यालयात सॅनिटायझर ठेवण्यात आलेले होते. जेणेकरून येणाऱ्या ग्राहकांना हात स्वच्छ करून प्रवेश दिला जात होता. जसजसे अनलॉकचे दिवस वाढत गेले, तसतसे सार्वजनिक ठिकाणचे सॅनिटायझर गायब होत चालले आहेत. तालुक्‍यातील बॅंकांनी आपल्या एटीएम सेंटरवर सॅनिटायझर सेवा उपलब्ध करून दिली होती. त्यात पैसे काढण्यासाठी जाण्यापूर्वी हात सॅनिटायझर केल्याशिवाय प्रवेश दिला जात नव्हता. 

मात्र, आता एटीएम सेंटरमधील सॅनिटायझर गायब झालेले आहे, तर अनेक दुकानदारांकडून सॅनिटायझर ठेवले जात नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एव्हाना लोकांनी सॅनिटायझरची गुणवत्ता तपासली की काय? असा प्रश्न पडत आहे. खरं तर अजून कोरोना संपलेला नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे तातडीने गंभीरपणे लक्ष घातले पाहिजे. गेल्या काही महिन्यांत ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा घट्ट होत चालला आहे. सामाजिक अंतराचे पालन कोठेही होताना दिसत नाही. या सर्व बाबी कागदावरच राहिल्या आहेत. 

प्रशासनाच्या वतीने सर्व सार्वजनिक ठिकाणी सॅनिटाझर, सामाजिक अंतराचे पालन करण्याबाबत सूचना केल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू आहे. सध्या जर यामध्ये काही प्रमाणात शिथिलता आली असेल, तर पुन्हा एकदा संबंधित विभागास सूचना देऊन सामाजिक अंतर आणि सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक करणार आहोत. 
-बाई माने, तहसीलदार 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

VIDEO: आरसीबी प्लेऑफमध्ये जाताच विरुष्काचं भन्नाट सेलिब्रेशन; व्हिडीओनं वेधलं साऱ्यांचे लक्ष

शेतीवर कर्ज घेणारा शेतकरी झाला अब्जाधीश! खात्यात आले ९९ अब्ज रूपये, रक्कम पाहून बँकेसह खातेधारकाला बसला धक्का

SCROLL FOR NEXT