सातारा

छान किती दिसते फुलपाखरू! शिराळ्यात दुर्मिळ 'एटलास मॉथ'चे दर्शन

Balkrishna Madhale

सातारा : जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले 'एटलास मॉथ' शिराळा तालुक्यातील कोकरूडच्या जलसंपदा वसाहत येथे सापडले. जलसंपदा विभागाच्या उपविभाग क्र. १ कार्यालयाच्या समोरील तुळशीच्या झाडावर हे पतंग (फुलपाखरू) काही काळ विसावले होते. हे फुलपाखरू साधारणपणे ८ इंच लांबीचे होते. त्याला पाहण्यास या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती. 

वसाहतीमधील कार्यालय प्रमुख प्रकाश लांडगे व इतर सर्व कर्मचाऱ्यांनी कुतूहलाने त्याचे फोटोही काढले. नंतर वसाहतीमधील मिनाजुल सरदार मुजावर, अभिजीत सकटे यांनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती शोधली असता ते दुर्मिळ व जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेले 'एटलास मॉथ' आहे हे समजले. जगातील सर्वात मोठ्या पतंगांमध्ये 'एटलास मॉथ'ची गणती होते. त्याचा रंग आकर्षक बदामी-तपकिरी व किंचित लालसर असतो. 

त्याच्या पंखांवर नकाशाप्रमाणे मोठे पांढरे ठिपके असतात. त्यामुळेच त्याला 'एटलास मॉथ' म्हणतात. याचे खास वैशिष्ट्य म्हणजे याला तोंड किंवा पचनसंस्था नसते. सुरवंट (आळी) असतानाच भरपूर खाऊन घेतलेले असते. या पतंगाचे आयुष्य जेमतेम पाच ते सात दिवसाचे असल्याने या अल्प कालावधीमध्ये अंडी घालून वारसा मागे ठेवून हे पतंग मरतात. अशा नैसर्गिक आश्चर्याने भरलेला हा दुर्मिळ जीव शक्यतो दक्षिण-पूर्व आशियात आढळतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT