satara sakal
सातारा

शासनाच्या निधीची वाट न बघता पूलाच्या दुरुस्तीचे काम स्वखर्चाने

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नांदगणे- पुनवडी दरम्यानचा वेण्णा नदीवरील पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता.

संदीप गाडवे

केळघर : नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नांदगणे- पुनवडी दरम्यानचा वेण्णा नदीवरील पूल वाहून गेल्याने सात ते आठ गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. जनतेची गैरसोय दूर व्हावी यासाठी आमदार छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार जि.प. सदस्या सौ.अर्चनाताई रांजणे व समाजसेवक ज्ञानदेव रांजणे यांनी तात्काळ फॉकलँन्ड, डंपर उपलब्ध करून शासनाच्या निधीची वाट न बघता स्वखर्चाने तात्काळ पूलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केल्याने परिसरातील जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

पुलाचे काम सुरू करावे याबाबतची बातमी सकाळमध्ये गुरुवारी ता:२६ ऑगस्ट ला प्रसिद्ध झाली होती. जावळी तालुक्यात २२ जुलैला झालेल्या अतिवृष्टीने केळघर परिसरातील वेण्णा नदी सह ओढ्या- नाल्याना मोठ्या प्रमाणात पूर आल्याने शेतीसह नांदगणे- पुनवडी व डांगरेघर दरम्यानच्या वेण्णा नदीवरील पूलाचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याने या पूलावरील वाहतुक बंद करण्यात आली होती . त्यामुळे परिसरातील पुनवडी , केडंबे , तळोशी ,वाळंजवाडी , बाहुळे , भुतेघर , बोडांरवाडी येथील ग्रामस्थ , विद्यार्थी , आजारी व्यक्ती यांना वळसा घालून डागंरेघर , आंबेघर मार्गे केळघरला यावे लागत आहे . यामुळे लोकांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत होता . तर वाहन न मिळाल्यास चालत पायपीट करावी लागत होती.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने परिसरातील जवळपास २० ते २२ गावातील नदी , ओढ्या काठांना असणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे . अशा गावांना आवश्यकतेनुसार साहित्य पुरवठा करत गावा- गावात मदतीचा हात रांजणे कुटुंबियानी दिला असून ऐन गणेशोत्सवाच्या काळात जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी ज्ञानदेव रांजणे (साहेब) यांनी स्वखर्चाने पूलाच्या दुरुस्तीसाठी दिलेले योगदान हे परिसरातील जनतेला दिलासा देणारे आहे . असे प्रतिपादन यावेळी विभागाचे ज्येष्ठ नेते मोहनराव कासुर्डे यांनी दुरुस्तीच्या शुभारंभ प्रसंगी केले .

यावेळी केळघर सेवा सोसायटीचे चेअरमन बबनराव बेलोशे , संचालक राघव बिरामणे , खादी ग्रामोद्योग संचालक अंकुश बेलोशे , माजी सरपंच सुनिल जांभळे , संतोष कासुर्डे , बंडोंपत ओंबळे , बाळासाहेब ओंबळे , महादेव ओबंळे , किरण ओंबळे , सुरेश पार्टे , पांडुरंग दळवी , विष्णू दळवी , चंद्रकांत ओंबळे , श्रीरंग पाडळे , बबन शिर्के यांच्यासह परिसरातील सरपंच , ग्रामस्थ उपस्थित होते .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT