सातारा

हात्रेवाडीकर जगताहेत आदिवासींचे जीवन; दोन तपांपासून रस्त्याची परवड, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

रविकांत बेलोशे

भिलार (जि. सातारा) : दुर्गम हात्रेवाडी (ता. जावळी) गावच्या ग्रामस्थांची रस्त्याच्या दुर्दशेने गेल्या दोन तपांपासून परवड सुरू असून, अजूनही येथील ग्रामस्थ आदिवासींचे जीवन जगत आहेत. 

कोयना जलाशयापलीकडे असणाऱ्या आपटी या गावाची हात्रेवाडी ही सुमारे 50 घरांची वाडी आहे. या वाडीला आपटीपासून तब्बल चार किलोमीटरचा रस्ता आहे. हा रस्ता एकेकाळी मुरमाची मलमपट्टी करून झाला आहे. त्या रस्त्याला आता 20 वर्षे झाली तरी कसलाही मुलामा लागला नाही. हा रस्ता खड्डे आणि चिखलमय झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात तर या रस्त्याची घसरगुंडी होते. या वाडीतील बहुतांश तरुण मंडळी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई, पुणे व इतरत्र विखुरली आहेत. गावात वृध्द, महिला व शालेय मुले फक्त आहेत. त्यामुळे या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मोठे हाल या हात्रेवाडी ग्रामस्थांचे चालले आहेत. या वाडीपासून साताऱ्याला जाण्यासाठी आपटीमार्गे निपाणी, तेटली, सौंदरी, अंधारीमार्गे बामणोली मार्ग असून, महाबळेश्वरला जाण्यासाठी गोगवे, रामेघर, तळदेव असा मार्ग आहे.

येथील तरुण वर्ग हा नोकरीधंद्यासाठी परगावी विसावला असल्याने गावाला कुणी कर्ताधरता उरला नाही. त्यामुळे आमची हाक पुढाऱ्यांपर्यंत पोचतच नाही. इथल्या ग्रामस्थांना फक्त निवडणुकीपुरते विचारात घेतले जाते. हात्रेवाडी ते आपटी हा जोडरस्ता झाल्यास येथील ग्रामस्थांचा वाहतुकीचा प्रश्न मिटेल. शेती काम करणे, शेतमालाची वाहतूक या साऱ्या गोष्टी सोयीच्या होणार आहेत. सरकार दरबारी अनेक वेळा अर्ज, विनंत्या करून देखील याबाबत आजवर कोणीही दखल न घेतल्याने हा रस्ता केवळ मातीतच राहिला आहे. 

राजकारणी आमच्याकडे फक्त पाच वर्षांनी निवडणुकीसाठी एकदा येतात. रस्ता करू असे आश्वासन देतात आणि गेले की पुन्हा पाच वर्षांनी येतात. त्यातच मागील पाच पंचवार्षिक निघून गेल्या आहेत. हा रस्ता होईल त्याची आशाच आम्ही आता गावकऱ्यांनी सोडून दिली आहे. त्यामुळे यापुढे ग्रामस्थ आता स्वस्थ बसणार नाहीत. 
-सुरेश कदम, ग्रामस्थ 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing Deadline: उद्यापासून 5,000 दंड; ITR भरण्याचा आज शेवटचा दिवस, 5 मिनिटांत स्वतः फाईल करा

Gold Rate Today : सोने पुन्हा स्वस्त, चांदीचाही भाव कमी, खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Sangli IT Bogus Raid : I Am From Income Tax म्हणत मध्यरात्री छापा, डॉक्टरला दीड किलो सोनं अन् १५ लाखांना चुना लावला...

भारतीयांमध्ये खेळाडूवृत्ती नाही...! शाहिद आफ्रिदीने 'Handshake' प्रकरणावर सूर्यकुमार यादव, BCCI ला सुनावले

Jalna Flood: शहरात पावसाचा हाहाकर सीना कुंडलिका नदीला पूर; शहरातील सखल भागात साचले पाणी

SCROLL FOR NEXT