Satara
Satara 
सातारा

माण तालुक्‍यासाठी "एमआयडीसी'तर्फे 500 पीपीई किट

विशाल गुंजवटे

बिजवडी (जि. सातारा) : माण तालुक्‍यात म्हसवड परिसरात लवकरच औद्योगिक वसाहत उभी राहत असून, कोरोनाच्या या लढ्यात वसाहतीने पुढाकार घेत पियाजो कंपनीच्या सहकार्यातून माण तालुक्‍याला आठ लाख 50 हजार रुपये किमतीच्या पीपीई किटच्या स्वरूपात मदत केली आहे. 

माण तालुक्‍याचे सुपुत्र व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे त्यांचे बंधू माजी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनी कोरोनाच्या निवारणासाठी तालुक्‍यात काहीतरी मदत करावी, अशी मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यामुळे माण तालुक्‍यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुभेदार यांनी पियाजो कंपनीच्या सहकार्यातून पीपीई किट पाठवून दिले आहेत. या साहित्यरूपी मदतीमुळे कोरोना रोगाचा सामना करताना ते उपयुक्त होणार असून, या मदतीबद्दल माण प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, पियाजो कंपनी व अधिकाऱ्यांचे आभार मानले. 

माण तालुक्‍यातील औद्योगिक वसाहतीचा वर्षानुवर्षाचा प्रश्न मार्गी लागला असून, लवकरच म्हसवड, हिंगणी भागात वसाहत उभी राहत आहे. कोरोनाने सर्वत्र थैमान घातले असताना त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन स्तरावरून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध कंपन्यांच्या सहकार्यातून राज्यभरात विविध ठिकाणी साहित्यरूपी मदत केली जात आहे. त्याचा एक भाग म्हणून माण तालुक्‍यात पियाजो कंपनीच्या सहकार्यातून साहित्य पाठवण्यात आले आहे. हा लढा लढण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळच्या माध्यमातून अजूनही मदत करण्यात येणार आहे, असे सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुभेदार यांनी सांगितले. 

संपादन : पांडुरंग बर्गे  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT