प्रतापगड साखर कारखाना
प्रतापगड साखर कारखाना sakal
सातारा

सातारा : प्रतापगड निवडणुकीत अवैध अर्जाचे अपील फेटाळले

महेश बारटक्के

कुडाळ : प्रतापगड साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सर्व स्तरांतून प्रयत्न होताना दिसत आहेत. अशातच अर्ज माघारी घेण्याच्या अगोदर दीपक पवार गटाच्या अवैध ठरवलेल्या अर्जाबाबत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक यांच्याकडून अपील फेटाळण्यात आले. त्यामुळे महिला राखीव २ , मेढा गटातील १ व सोसायटी गटातील १ जागा अशा चार जागा बिनविरोध होणार आहेत.

प्रतापगड साखर कारखान्यासाठी २१ जागांसाठी ८३ अर्ज दाखल झाले होते. छाननीत ७३ अर्ज वैध ठरले होते. कारखान्याच्या या रणधुमाळीत दीपक पवार गटाने उडी घेतल्याने निवडणूक रंगणार असे असताना निवडणुकीच्या अर्ज माघे घेण्याआधी त्यांच्या चार जागांचे अर्ज अपिलात आज फेटाळल्याने संस्थापक सहकार पॅनेलचे पारडे जड झाले असून, चार जागी विजयाची केवळ औपचारिकता उरली आहे.

अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी या चारही जागा बिनविरोध होणार आहेत. हे आजच्या निकालामुळे स्पष्ट झाले आहे. प्रादेशिक सह संचालक पुणे यांच्या या निर्णयाने दीपक पवार गटाला धक्का बसला असून, सौरभ शिंदे यांचे पारडे जड झाले आहे. अर्जदारांची छाननी प्रक्रियेत दीपक पवार गटाचे अर्ज बाद करण्यात आले होते. मात्र, त्या निर्णय विरोधात दीपक पवार गटाकडून पुणे येथील निवडणूक कार्यालयात अपील दाखल करून आव्हान निर्माण केले होते. मात्र, ते आज फेटाळण्यात आले. यामुळे महिला गटाच्या दोन, सोसायटी गट एक व मेढा गटातील एक जागा बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT