Satara district administration alert due rising corona Instructions for using mask
Satara district administration alert due rising corona Instructions for using mask esakal
सातारा

Corona Update : वाढत्या कोरोनामुळे सातारा जिल्हा प्रशासन अलर्ट; मास्क वापरण्याच्या सुचना

हेमंत पवार

कऱ्हाड : सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोन आठवड्यापासून वाढू लागली आहे. त्यातच दोन रुग्णांचाही कोवीडमुळे मृत्यू झाला आहे. त्याचा विचार करुन जिल्हा प्रशासन सध्या अलर्टवर आहे.

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बैठक घेवुन सर्व वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना चाचण्या वाढवण्यासह आवश्यक उपाययोजना सुरु करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीची कार्यवाही आजपासूनच सर्व शासकीय रुग्णालयातुन सुरु करण्यात आली आहे.

दरम्यान जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांबरोबरच सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँकांमधील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना मास्कचा वापर करण्‍याची सक्‍ती करण्‍यात आली असून याबाबतचा आदेश जिल्‍हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी जाहीर केला.

सातारा जिल्ह्यात गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना बाधीतांची संख्या वाढू लागली आहे. सध्या जिल्ह्यात 48 कोरोना बाधीत रुगण आहेत. त्यापैकी 11 जणांवर हॉस्पीटलमध्ये उपचार सरु आहेत. तर दोन कोरोना बाधीत रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधीत होण्याचा रेट 25 टक्के आहे. तो रेट वाढल्यामुळे जिल्हा प्रशासन अलर्टवर आले आहे. जिल्हाधिकारी जय़वंशी यांनी जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेश गायकवाड, जिल्ह्यातील सर्व उपजिल्हा रुग्णालाय, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली.

त्यामध्ये त्यांनी राज्य शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांची माहिती देवुन गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे, सर्व शासकीय रुग्णालयातील बेडची तयारी करुन ठेवणे, रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसींग करणे, औषधांची उपलब्धता योग्य प्रमाणात आहे का याच खात्री करणे आदी सुचना दिल्या आहेत.

त्यानुसार आता सर्व शासकीय रुग्णालयातील यंत्रांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. त्याचबरोबर कमी असलेल्या सोयी-सुविधा तात्काळ करुन घेण्याची कार्यवाही आजपासूनच सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर आजपासूनच रुग्णालयात मास्क वापरणे अधिकारी, कर्मचारी यांना बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान नागरीकांनाही गर्दीच्या ठिकाणी, एसटीने प्रवास करताना मास्क वापरावा, आवश्यक तेवढे सुरक्षीत अंतर ठेवावे असेही आरोग्य विभागाने नागरीकांना आवाहन केले आहे.

ज्यांना थंडी, ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आहेत त्यांनी आजार अंगावर न काढता तातडीने तपासणी करुन औषधोपचार करावा. ज्यांना शंका आहे त्यांनी कोरोना चाचणी करावी. जे कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आले आहेत त्यांनी स्वतःहून चाचणी करुन घ्यावी.

डॉ. राजेश शेडगे,प्रभारी वैद्यकीय अधिक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोन जणांचा जीव घेऊनही आरोपी का सुटला? कायदा काय सांगतो? कायदेतज्ज्ञांनी सांगितल्या तरतुदी

MS Dhoni: 'माझं चेन्नईबरोबरचं नातं...', निवृत्ती घेणार की नाही चर्चेदरम्यान धोनीच्या CSK बद्दलच्या भावना आल्या समोर

Iran President Helicopter Crash : इब्राहिम रईस यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत खामेनींच्या मुलाचा हात? इराणमध्ये सत्तासंघर्ष पेटणार, जाणून घ्या सविस्तर

Lok Sabha Election 2024 : दिव्यात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; मतदारांत तीव्र संताप

Nashik Lok Sabha: नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे माजी आमदार वसंत गीतेंमध्ये वाद; बूथवर उडाला गोंधळ

SCROLL FOR NEXT