Grapes Production sakal
सातारा

Satara News : यंदा तरी द्राक्षे गोड लागणार?

कलेढोण भागात फुलल्या बागा; शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा

अंकुश चव्हाण

कलेढोण : दोन वर्षे झालेल्या अतिवृष्टी व कोरोनामुळे तोट्यात आलेली द्राक्ष शेती यंदा तरी शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देईल का? या आशेवर भागातील द्राक्ष उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या वर्षी द्राक्षबागांना पावसात कसाबसा तग धरला होता. फलधारणा अपुरी झाल्याने द्राक्षांचे उत्पादन निम्म्याहून खाली आले. मात्र, यावर्षी भागातील द्राक्षबागा फुलल्या असून चांगल्या दराची अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.

दुष्काळी कलेढोण भागातील कलेढोण, मायणी, विखळे, गारळेवाडी, पाचवड, तरसवाडी, गारुडी, निमसोड, चितळी आदी भागातील सुमारे सातशे एकर क्षेत्रावर शेतकरी निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतात. त्यातून शेतकऱ्यांच्या हातात चार पैसे येतात. मात्र, कोरोनाच्या महामारीत द्राक्षांची कमी झालेली निर्यात आणि गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे उत्पादनात झालेली घट यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला.

यावर मात करीत भागातील द्राक्षांच्‍या ऑक्टोबरमध्ये छाटण्या पूर्ण झाल्या आहेत. पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेल्या बागांत यंदा चांगले फ्लॉवरिंग होऊन फळधारणाही चांगली झाली आहे. त्यामुळे यंदा द्राक्षांचे उत्पादन वाढणार आहे. गतवर्षी निर्यातक्षम द्राक्षास ६० ते ८० प्रति किलो दर होता. स्थानिक बाजारपेठेत २० ते ३५ रुपये प्रति किलो दर मिळाला होता. अवेळी पडणारा पाऊस, लहरी हवामानामुळे गत दोन वर्षांत झालेले नुकसान यंदा कसे भरून काढता येईल ? याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

व्यापाऱ्यांनी थांबवावी लूट...

गेल्या दोन वर्षांत पावसामुळे द्राक्षांचे उत्पन्न निम्म्याहून कमी आले होते. त्यात कोरोनाचे कारण सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची दरात लूट केली. अपेक्षेप्रमाणे दर न मिळाल्याने शेतकरी तोट्यात गेला. तोट्यात गेलेल्या शेतकऱ्यांची कर्जेही थकीत गेली. कर्जाऊ, हात उसने करून टिकवलेल्या बागांत यावर्षी शेतकरी आपले नशिब आजमवताना दिसतो आहे. द्राक्ष शेतीत झालेले नुकसान यावर्षी द्राक्षांना चांगला दर मिळाला तर भरून निघण्यास मदत होणार आहे. त्यामुळे दोन वर्षांत झालेली आंबट द्राक्षे यंदा तरी गोड होणार का? असा शेतकरी सवाल उपस्थित करत आहेत.

गेल्या दोन वर्षांत शेतकऱ्यांनी पिकवलेल्या द्राक्षांना अपेक्षित दर मिळाला नाही. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची लूट थांबवून योग्य दर देऊन शेतकऱ्यांना हातभार लावावा.

- दीपक येलमर, शेतकरी, कान्हरवाडी, ता.खटाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT