karad
karad 
सातारा

दमदार पावसाने "या' पिकांना तारले

सकाळ वृत्तसेवा

खटाव (जि. सातारा) ः गेल्या आठवड्यापासून पडत असलेला दमदार पाऊस हा उत्तर खटाव तालुक्‍यातील खरीप पिकांना पोषक ठरला आहे. सुरवातीच्या टप्प्यात पडलेल्या पावसानंतर अनेक दिवस पावसाने मारलेल्या दडीमुळे खरीप पिके धोक्‍यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आले, घेवडा, सोयाबीन, बटाटा, ऊस आदी पिकांना पोषक ठरला आहे. 

या वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस वेळेत झाल्याने शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी आटोपून घेतली. मात्र, पीक उगवून आल्यानंतर पावसाने ओढ दिली. उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली. उन्हाळ्यासारखे ऊन पडू लागल्याने पिके करपण्याच्या अवस्थेत पोचली. स्वाभाविकच शेतकरी चिंतेत आला होता. त्यात भरीस भर अनेक गावांत सोयाबीन पिकावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. योग्य प्रतीचे बियाणे उपलब्ध न झाल्याने त्याचा फटका सहन करावा लागल्याची शेतकऱ्यांतून चर्चा होत आहे. शिवाय टाळेबंदीमुळे मालवाहतुकीला बंदी असल्याने अनेक शेतकऱ्यांचा कांदा जागेवरच सडला. अशा एक ना अनेक चक्रव्यूहातून जात असताना शेतकऱ्यांना नक्की करावे तरी काय, असा प्रश्न पडला होता. 

गेल्या आठवड्यापासून तालुक्‍यातील अनेक गावांत दोन- दोन तास मुसळधार पाऊस झाला. ओढे, नाले तुडुंब भरून वाहिले. जलसंधारणाद्वारे झालेले बंधारे भरून वाहिले. या पावसाने खरिपातील सर्व पिकांना जीवदान मिळाले आहे. पावसाने वेळत लावलेल्या हजेरीमुळे पिकांना नवसंजीवनी मिळाल्याने शेतकरी हरकून गेला. हा पाऊस सोयाबीन, घेवड्यासारख्या कोरडवाहू पिकांना चांगला फायदेशीर झाला आहे. अनेक गावांत सोयाबीन व घेवड्याची कोळपणी सुरू असल्याचे दिसत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: नागपूरकडे निघालेल्या हेलिकॉप्टरचं जालन्यात इमर्जन्सी लँडिंग

Champions Trophy 2025 : जागा ठरली! पाकिस्तानने केली मोठी घोषणा; PCBच्या निर्णयानंतर BCCI उचलणार मोठं पाऊल?

Kansas Bizarre : आधी बायकोची केली हत्या, मग विम्याच्या पैशातून खरेदी केली चक्क 'सेक्स डॉल'.. पोलीसही झाले हैराण!

Shilpa Shetty: शिल्पाच्या मुलाला पंजुर्लीने दिला आशीर्वाद! काय आहे शिल्पाचं कांतारा कनेक्शन ?

Big Discount: केंद्रानंतर 21 राज्यांनी केली घोषणा! जुनी कार स्क्रॅप करून नवीन कारवर मिळेल 50 हजारांची सूट

SCROLL FOR NEXT