मतमोजणी
मतमोजणी sakal
सातारा

Satara : कऱ्हाड बाजार समितीच्या मजमोजणीस प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड : येथील शेती उत्पन्न बाजार समितीसाठी काल (रविवारी) मोठ्या चुरशीने ९७.१९ टक्के मतदान झाले. या निवडणुकीसाठी मोठा फौजफाटा तैनात असल्याने मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीमुळे कऱ्हाड तालुक्यातील नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणीस आज सोमवारी सकाळी प्रारंभ झाला असुन मतदारांचा कौल कोणाला मिळणार याचा फैसला मतमोजणीव्दारे सुरु झाला आहे. थोड्याचवेळात निकालाचे चित्र स्पष्ट होणार आहे.

कऱ्हाड शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत काँग्रेस विरुध्द राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा सामना झाला. त्यामुळे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी सहकारमंत्री आमदार बाळासाहेब पाटील, काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे कार्यकारणी सदस्य अतुल भोसले यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणुक बनली होती.

बाजार समितीच्या सोसायटी मतदार गटातील १८९९ पैकी १८४९ मतदारांनी मतदान केले. ग्रामपंचायत गटातील १९२२ मतदारापैकी १८७७ मतदान कले. व्यापारी गटातील ३७२ मतदारापैकी ३४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकुण ४१९३ मतदारापैकी ४०७५ मतदारांनी मतदान केल्याने सरासरी ९७.१९ टक्के मतदान झाले. निवडणूक निरीक्षक तहसीलदार विजय पवार, निवडणुक निर्णय अधिकारी संदिप जाधव यांच्या उपस्थितीत मतमोजणीला प्रारंभ झाला आहे.

पहिल्या टप्प्यात सोसायटी गटातील मतांची मोजणी केली जाणार आहे. मतमोजणीसाठी सात टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे.त्यामध्ये मतदारांचा कौल कोणाला मिळणार हे थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे. कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी आर पाटील यांनी मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT