Satara
Satara 
सातारा

नैसर्गिक संसाधनांचा वापर करून स्पोर्टसमन घडविण्याचे युवकाचे मिशन!

केशव कचरे

बुध (जि. सातारा) : शिंदेवाडी (ललगुण, ता. खटाव) गावचा अतुल अमृत माने हा युवक नैसर्गिक संसाधनांचा वापर करून ग्रामीण भागातील गोरगरीब, गरजू युवकांना विविध क्रीडा प्रकारांचे मोफत प्रशिक्षण देत असून, त्यातून त्यांनी स्पोर्टसमन घडविण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. 

घरची परिस्थिती हलाखीची. कसलीही साधने उपलब्ध नसताना अतुलने रडतखडत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. शिक्षण घेताना त्याला खेळाची आवड निर्माण झाली. गोळाफेक, भालाफेक प्रकारात शालेय क्रीडा स्पर्धांत त्याने जिल्हास्तरापर्यंत झेप घेतली. ऑलिंपिकमध्ये खेळण्याचे स्वप्न त्याचे होते. परंतु, हलाखीच्या परिस्थितीमुळे तो सरावासाठी लागणारा भाला विकत घेऊ शकत नव्हता. भाल्याच्या किमती 800 रुपयांपासून 50 हजारांपर्यंत असल्याने तो कळकाच्या बांबूला लोखंडी पत्र्याचे टोक जोडून भालाफेकचा सराव करत असे. त्याच्या या खटपटीपासून घरचे लोक व समाज अनभिज्ञ होता. या खेळामध्ये एक-दोन पदके मिळवून शिक्षणाचा आणि पदकाचा त्याचा प्रवास थांबला तो कायमचा. 

मग सुरू झाला पोटापाण्याचा प्रवास. भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्याने सुरवातीला शेळीपालन व्यवसाय निवडला. खूप खस्ता खाल्या, पण त्यातही त्याला फारसे यश आले नाही. शेळीपालनामागचा त्याचा उद्देश खरे तर वेगळाच होता. या व्यवसायात पैसे कमावून त्याला 40 हजारांचा भाला विकत घ्यायचा होता. मात्र, हेही स्वप्न अखेर अधुरेच राहिले. पोटासाठी त्याने पुन्हा वेगवेगळे प्रयोग आणि प्रयत्न सुरू केले. आजअखेर सुरूच आहेत. 

करिअर घडविण्यासाठी योग्य दिशा आणि मार्गदर्शन न मिळाल्यामुळे गुणवत्ता असूनही खेड्यातील मुलांना त्यांच्या योग्यतेनुसार नोकरी, व्यवसाय किंवा करिअरचे क्षेत्र मिळत नाही, निवडता येत नसल्याची खंत अतुल व्यक्त करतो आणि म्हणून त्याने अलीकडे एक मिशन हाती घेतलंय स्पोर्टसमन घडवायचे. गावातील शाळा, महाविद्यालयांत जाणारी जी मुले क्रीडा क्षेत्रामध्ये काही करू इच्छितात, त्यांना तो मोफत त्या-त्या क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण देतोय. त्यासाठी त्याने पूर्णतः नैसर्गिक संसाधनांचा वापर सुरू केला आहे. 

भालाफेक आणि नेमबाजीसाठी त्याने वनीकरणातील दोन झाडांना बांबू आणि घायपातापासून तयार केलेला झापा बांधला आहे. त्यावर गादी बांधून तो मुलांना नेमबाजी व भालाफेकीचे ट्रेनिंग देतो आहे. मोटारगाड्यांच्या जुन्या टायरांचा वापर वेट पुलिंगसाठी तर एका बांबूच्या दोन्ही बाजूला गोणपाटाची पोती बांधून त्यात दगड धोंडे भरून तयार केलेल्या साधनाचा वापर तो वेटलिफ्टिंगसाठी करतो. अन्य क्रीडा प्रकारांसाठी वनीकरणातील विविध झाडांचा वापर त्याने खुबीने करून घेतलेला आहे.

कोणालाही, कसलीही मदत न मागता आणि कसलाही उपद्रव न देता त्याचे प्रशिक्षण सुरू आहे. त्याच्याकडे आज आठ ते दहा मुले प्रशिक्षण घेत असून, त्याने प्रशिक्षित केलेले शालेय विद्यार्थी जिल्हा आणि राज्य स्तरावर चमकदार कामगिरी करत आहेत. त्यातील अनिकेत पवार, संकेत ढवळे, अभिषेक पवार, अमित फाळके (भालाफेक), विरेंद्र पवार 200 मीटर धावणे व अथर्व फाळके याने कुस्तीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत पात्रता सिद्ध केली आहे. 


दगड-धोंडे जमा करून तालीम बांधण्याचे काम सुरू 

सध्या शिवारातील दगड-धोंडे एकत्र करून मुलांना कुस्तीसाठी तालीम बांधण्याचे त्याचे काम सध्या सुरू आहे. परिसरामधील गोरगरीब, होतकरू युवकांसाठी अतुल आशेचा किरण ठरतो आहे. त्याच्या या आगळ्या 
वेगळ्या उपक्रमांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

संपादन : पांडुरंग बर्गे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MDH Everest Spices: एमडीएच आणि एव्हरेस्ट मसाल्यांवर मालदीवनेही घातली बंदी; कंपनीने दिले स्पष्टीकरण

IPL 2024 : थाला फॉर अ रीजन! धोनीसाठी पठ्ठ्याने गर्लफ्रेंडसोबत केला ब्रेकअप; पोस्टरचा सोशल मीडियावर धुमाकूळ

Mumbai Local News : रुळावरून घसरली CSMT लोकल; रेल्वे वाहतूक ठप्प ! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचे प्रचंड हाल !

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प; CSMT स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला

SCROLL FOR NEXT