सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल नुकताच लागला. यामध्ये सातारा जिल्ह्याचा डंका पुन्हा सर्वदूर पोचला आहे. मर्ढे येथील अनुजा राजेंद्र जाधव हिने एमपीएससीच्या अभियांत्रिकी सेवा परीक्षा २०२० मध्ये महिला प्रवर्गात राज्यात १३ वा क्रमांक (अराखीव महिला प्रवर्गात ८ वा) क्रमांक पटकविला. या यशाने अनुजाने मर्ढे गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
अनुजा हिचे वडील राजेंद्र विलास जाधव हे मर्ढे गावचे माजी सरपंच असून, ते शेतकरी आहेत. अनुजाचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मर्ढे येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव महाविद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण सायन्स कॉलेजमध्ये झाले, तर सांगली येथील वालचंद कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली. एमपीएससी व यूपीएससीसाठी अनुजाने हैदराबाद येथे १ वर्ष अभ्यास केला. राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथील अभ्यासिकेत अनुजा सकाळी ८ ते सायंकाळी ७ यावेळेत अभ्यास करत असे. मर्ढेचे उपसरपंच अमोल शिंगटे, मानसिंग शिंगटे, उमेश शिंगटे, उमेश कुलकर्णी व पोलिस पाटील, महेश रोकडे यांच्या वतीने अनुजा जाधवचा छोटेखानी सत्कार करण्यात आला.
वडिलांचे स्वप्न केले साकार
राजेंद्र जाधव हे मर्ढे येथील एक सर्वसामान्य कुटुंबातील असून, त्यांनी सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये करिअर करण्याची आवड होती; परंतु हे स्वप्न स्वप्नच राहिले. त्यांनी हे स्वप्न आपली मुलगी अनुजाला पाठिंबा देऊनतिला स्पर्धा परीक्षेसाठी प्रवृत्त केले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.